अख्तर काझी
दौंड : मुस्लिम समाजकार्यात स्वतःला वाहून घेतलेले व मुस्लिम नवयुवकांना मशिदीचा मार्ग दाखविणारा सामाजिक कार्यकर्ता जावेद(फिटर) बाबुमिया खान(वय 52) यांचे आज दिनांक 8 जानेवारी रोजी राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जावेद यांच्या पश्चात आई ,पत्नी, 2 मुली ,एक मुलगे , पाच भाऊ असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते उबेद खान व सर्पमित्र नौशाद खान यांचे ते बंधू होत.जावेद भाई समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये हिरीरीने भाग घेत.
त्यांच्या एका कामाचे वैशिष्ट्य म्हणजे, समाजातील कोणत्याही घरी मयत झालेली त्यांना जर कळाली की ते त्वरित त्या घरी जाऊन धार्मिक विधीच्या कामात मदत करीत मग ते घर श्रीमंताचे असो की गरीबाचे. मुस्लिम दफन भूमीतील संपूर्ण धार्मिक विधीसाठी त्यांची मदत मोलाची ठरायची. जावेद यांचे शहरात दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज होते. गॅरेज मध्ये शहरातील अनेक बेरोजगार युवकांना त्यांनी दुचाकी दुरुस्तीचे काम शिकविले. या कामासाठी त्यांनी कधीही कोणाकडूनही मोबदला घेतला नाही. जावेद भाई समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये हिरीरीने भाग घेत.
त्यांच्या एका कामाचे वैशिष्ट्य म्हणजे, समाजातील कोणत्याही घरी मयत झालेली त्यांना जर कळाली की ते त्वरित त्या घरी जाऊन धार्मिक विधीच्या कामात मदत करीत मग ते घर श्रीमंताचे असो की गरीबाचे. मुस्लिम दफन भूमीतील संपूर्ण धार्मिक विधीसाठी त्यांची मदत मोलाची ठरायची. जावेद यांचे शहरात दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज होते. गॅरेज मध्ये शहरातील अनेक बेरोजगार युवकांना त्यांनी दुचाकी दुरुस्तीचे काम शिकविले. या कामासाठी त्यांनी कधीही कोणाकडूनही मोबदला घेतला नाही.
काम शिकायला आलेला मुलगा जर मुस्लिम समाजाचा असेल तर जावेद भाई त्याला सांगायचे की तू फक्त पाच वेळेस मशिदीत जाऊन नमाज अदा कर मी तुला दुचाकी दुरुस्तीचे संपूर्ण काम शिकवेन, अशा पद्धतीने त्यांनी अनेक मुस्लिम युवकांना मशिदीचा मार्ग दाखवून त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणला आहे. जावेद खान यांच्या अचानक जाण्याने शोक व्यक्त करण्यात येत आहे.