‘राहुल कुल’ यांच्या वरवंड सभेची ‘गर्दी’ पाहून विरोधक भांबावले, बोगस माणसांचे व्हिडीओ बनवून लोकांना पाठवू लागले..

दौंड : ‘राहुल कुल’ यांच्या वरवंड येथील सभेची ‘गर्दी’ पाहून विरोधक चांगलेच भांबावलेले दिसत आहेत. सभा जोरात झाली तर त्यास गालबोट लावण्यासाठी विरोधकांनी अगोदरच प्लॅन केला होता असे आता उघड झाल्याची माहिती दिनेश गडधे यांनी दिली. सभेवेळी बोगस माणसांचे व्हिडीओ बनवून ते लोकांना सोशल मीडियावर पाठवू लागले असताना अश्या कॅमेरा मॅन आणि त्याने सोबत आणलेल्या माणसाला विचारणा करू लागल्यानंतर त्यांनी पळ काढल्याचा प्रकार घडला आहे.

गडधे यांनी याबाबत अधिक माहिती देताना, काही वेळापूर्वी आमदार राहुल कुल यांची वरवंड येथील बाजार मैदानात जंगी सभा झाली. या सभेला संपूर्ण तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर लोकांचा प्रतिसाद मिळाला मात्र कायम काही ना काही कुरखोड्या करण्याची सवय असणाऱ्या एका बहाद्दराने स्वतःच्या मार्जितील काही माणसं अगोदरच बाहेरून आणून ती सभा संपल्यानंतर लगेच जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या मागे उभे करून त्यांचे व्हिडीओ रेकॉर्ड करू लागले.

स्वतः सोबत आणलेल्या या लोकांना अगोदर ठरल्याप्रमाणे तुम्ही कुठले आणि कशासाठी आला असे प्रश्न विचारून ज्या प्रमाणे यांनी त्यांना बोलायला लावले त्या प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि त्या लगेच सोशल मीडियाच्या विविध ग्रुपवर सोडू लागले. आम्ही ग्रुपवर त्या प्रतिक्रिया पाहत असताना असाच एक प्रकार आमच्या समोर होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले. आम्ही तेथे जवळ जाऊन त्यांना तुम्ही कोणत्या चॅनेलचे पत्रकार आहात असे विचारत असताना त्या व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या आणि प्रतिक्रिया देणाऱ्या अश्या दोन्ही लोकांनी एकाच गाडीवर बसून पळ काढला आणि नेमका हा काय प्रकार आहे हे आमच्यासह तेथे उपस्थित लोकांच्याही लक्षात आला.

त्यामुळे विरोधक इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करतील असे वाटले नव्हते पण सत्ता काबीज करण्यासाठी आज जे षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला गेला हा निषेधार्थ होता हे नक्की. आमदार राहुल कुल यांना गर्दी जमवण्यासाठी बाहेरून माणसे आणण्याची गरज नाही. कुल यांचे काम आणि जनतेचा त्यांच्यावर असणारा विश्वास सर्वांना माहित आहे. दौंड येथे फॉर्म भरताना झालेली गर्दी ध्यानात घेऊन त्यांच्या सभेला पुन्हा गर्दी होणार हे विरोधकांना माहित होते त्यामुळे विरोधकांनी आज या सभेबाबत संभ्रम निर्माण करण्यासाठी आधीपासूनच हे मोठे षडयंत्र रचले होते मात्र वेळीच ते उघड झाल्याने त्यांची छी थू झाली आहे असेही गडधे यांनी सांगितले.