आरोग्यनामा – अब्बास शेख
पुणे : अचानक उद्भवलेला आजार अण डॉक्टरांनी पुण्यात घेऊन जा, रुग्णाचं येथे काही खरे नाही असे म्हणून तातडीने पुण्यात घेऊन जाण्याचा दिलेला सल्ला. या सर्व प्रकारामुळे नातेवाईकांची पाचावर बसलेली धारण अण बेशुद्ध पडलेला रुग्ण यामुळे आता आपल्या माणसाला परमात्म्याशिवाय कुणाचा आधार राहिला अशी झालेली समज आणि त्यातून डोळ्यासमोर दाटून आलेला अंधार. मात्र त्याचवेळी एक आशेचा किरण दिसतो, ज्या तालुक्यात आपण राहतो त्या तालुक्यात परमात्म्याच्या कृपेने आरोग्यदूतही राहतो त्यामुळे कसलीही वेळ न दवडता थेट आमदार राहूल कुल यांना फोन जातो अण पुण्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा हलू लागते. ही कहाणी आहे तब्बल १४ दिवस बेशुद्ध राहून नंतर शुद्धीत आलेल्या अण १० लाख रुपये खर्च होऊनही एक रुपयाही न भरता ठणठणीतपणे बरे होऊन सव्वा महिन्यानंतर घरी आलेल्या अमोल भिंगारदिवे यांची.
अंगावर शहारे आणणारे बेशुद्धावस्थेतील ते १४ दिवस – गेल्या महिन्यात अमोल भिंगारदिवे यांना अचानक थंडी आणि ताप आला. त्यांनी स्थानिक दवाखान्यात दोन दिवस उपचार घेतले परंतु त्यांना येथे फरक पडला नाही त्यामुळे त्यांना दौंडला एका खाजगी रुग्णालयात दाखवण्यात आले. त्यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरही हबकले. अमोल ला तातडीने पुण्यात हलवावे लागेल. येथे इलाज होणे शक्य नाही आणि वेळसुद्धा कमी आहे असे दौंडच्या डॉक्टरांनी सांगितले. अमोल यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असून ते दुसऱ्याच्या जेसीबी मशीनवर काम करतात त्यामुळे पुढे कसे होणार असा प्रश्न त्यांच्या नातेवाईकांना पडला. यावेळी अमोल यांचा मित्र गणेश साळवे यांनी त्यांना पुण्यात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र पुण्यातील हॉस्पिटलमध्ये खर्चाचा मेळ कसा घालणार याचा विचार सुरू असताना गणेश साळवे (आरपीआय कार्यकर्ते) यांनी दौंड चे आमदार राहुल कुल यांना रात्री अकरा वाजता फोन करून सर्व हकीकत सांगितली.
रात्री ११ वाजता फोन आला अण रात्रीत आमदारांनी यंत्रणा हलवली – गणेश साळवे यांनी आमदारांना फोन करून हकीकत सांगितल्यानंतर पुण्यातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये अमोल ला दाखल करण्यात आले. अमोलला पुण्याला घेऊन जात असतानाच तो बेशुद्ध पडला. आ.राहुल कुल यांनी रात्री हॉस्पिटल व्यवस्थापनाशी बोलून अमोल याच्यावर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. अमोल ला पुण्यातील हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यानंतर तो वाचण्याची शक्यता कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र आमदार राहुल कुल यांनी संबंधित डॉक्टरांशी बोलून उपचार सुरू ठेवण्याचे सांगितले.
१४ दिवसानंतर अमोल शुद्धीवर आला.. सुमारे १४ दिवसानंतर अमोल भिंगारदिवे शुद्धीवर आले. अमोल शुद्धीवर आल्यावर त्यांच्या कुटुंबियांना रडू कोसळले आणि त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आपल्या सोबत काय घडलं, आपण आरोग्यदुताच्या पाठपुराव्यामुळे कसे यमदूताच्या तावडीतून सुटलो हे अमोल ला माहित होते त्यामुळे मला घरी घेऊन न जाता अगोदर आ.राहूल कुल यांच्याकडे घेऊन जा असा हट्ट अमोल भिंगारदिवे यांनी आपले कुटुंबिय आणि आपले मित्र गणेश साळवे यांच्याकडे केला.
दादाला भेटेल आणि त्यानंतरच घरी जाईल, भेट झाली अण सर्वांचे डोळे पाणावले.. शुद्धीवर आल्यानंतर सुमारे सव्वा महिना उपचार घेऊन अमोल यांनी, मला दवाखान्यातून घरी न नेता आ.राहुल कुल यांच्या भेटीला न्या असा आग्रह अमोल यांनी धरला. त्यानुसार त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना पुण्यावरून थेट आ.राहुल कुल यांच्याकडे आणून त्यांची भेट घालून दिली. भेट झाल्यानंतर तुमच्यामुळेच माझा पुनर्जन्म झाला असून आमच्यासारख्या हजारो रुग्णांचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत. तालुक्याची धुरा अश्या कार्यक्षम, कार्यतत्पर माणसाच्या हातात असेल तर इथली जनता तुमच्यासारख्या आरोग्यदुताच्याच मागे ठामपणे उभी राहील. तुम्हाला निवडणुकीत कसलीच अडचण येणार नाही हे रडत रडतच अमोल सांगू लागला. या भावनिक क्षणी परिसरातील वातावरणही भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
आमदारकीच्या लालसेने नव्हे तर माझे कर्तव्य म्हणून मी झटतोय आ.राहूल कुल.. ज्यावेळी अमोल यांनी, दादा तुम्हीच आमदार होणार आमच्या सर्व गोरगरिबांचे आणि जनतेचे आशिर्वाद तुम्हाला आहेत असे म्हटले त्यावेळी, आ.कुल यांनी मी आमदारकीच्या लालसेने लोकांची मदत करत नाही तर हे माझे कर्तव्यच आहे आणि ते मी पार पाडत राहणार असे म्हणताच पुन्हा एकदा अमोल यांच्या डोळयांत पाणी तरळले.
१० लाख खर्च अण एक रुपयांही न भरता उपचार हे फक्त आ.राहुल कुलच करू शकतात.. गणेश साळवे – या सर्व घटनेत महत्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या गणेश साळवे यांनी बोलताना, जी वेळ अमोलवर आली तशी वेळ कुणावरही येऊ नये, एकवेळ तर अशी आली की आम्ही त्याला गमवले असे आम्हाला वाटतं होते, मात्र राहुल दादांच्या सूचनेनंतर अमोलवर डॉक्टरांकडून तातडीचे आणि खूप चांगले उपचार करण्यात आले. यात सुमारे दहा लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आणि आमदार राहुल कुल यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाशी बोलून एक रुपयाही न भरता अमोल याला रुग्णालयातून घरी पाठवले. ही किमया केवळ आमदार राहुल कुलच करू शकतात असा विश्वास राहुल साळवे आणि अमोल भिंगारदिवे यांनी यावेळी व्यक्त केला.
आमच्यासारख्या गोरगरिबांच्या आशीर्वादामुळे दौंड तालुक्याचा आमदार राहुल कुल हेच होणार आणि त्याच आमदाराची गरज तालुक्याला आहे. आज माझा जीव केवळ आ.राहुल कुल यांच्यामुळे वाचला आहे. नुसता बोलणार नव्हे तर कृतीतून मदत करणारा आमदार तालुक्याला हवा आणि तो राहुलदादाच आहे.
अमोल भिंगारदिवे, रावणगाव, दौंड.