महिलांना लिफ्ट देऊन लूटमार करणारा पाटस येथील आरोपी जेरबंद

दौंड : महिलांना गाडीमध्ये लिफ्ट देऊन त्यांच्या जवळील दागिने आणि सोने चोरी करणाऱ्या आरोपीला दौंड पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले आहे. वाटमारी करणारा हा आरोपी पाटस येथील असून प्रफुल्ल उर्फ बिंदु प्रकाश पानसरे (वय २८ रा. पाटस ता. दौड जि. पुणे) असे त्याचे नाव आहे.

हेही पहा

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक १७/७/२०२४ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास दौंड गावच्या हद्दीत असणाऱ्या नगरमोरी चौकात ऋतुजा निलंकठ पुकळे (रा, संभाजीनगर, जि. संभाजीनगर) ह्या एस.टी. बसची वाट पहात उभ्या होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळ एक पांढ-या रंगाची ४ चाकी गाडी येऊन थांबली. त्यातील अनोळखी इसमाने त्यांच्याजवळ येवुन कोठे जायचे आहे अशी विचारना करत मी नगरला चाललो आहे मी तुम्हाला सोडतो असे म्हणुन त्यांना कारमध्ये बसवले.

त्या इसमाने ही गाडी दौंड गावच्या हद्दीत असलेल्या सोनवडी नदीच्या पुलाजवळ कार थांबवुन या महीलेस दमदाटी करून महीलेच्या गळ्यातील सोन्याची चैन बळजबरीने हिसकावुन त्यांच्याकडे असलेली बॅग घेवुन निघून गेला. या बाबत फिर्यादी महिलेने दौंड पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरण गंभीर असल्याने दौंड चे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी डि.बी पथकास गुन्ह्याच्या अनुशंगाने तपास करण्याच्या सुचना दिल्या व एक टिम तयार करून गुन्हा घडला त्या ठिकाणचे सी. सी.टि.व्ही फुटेज तपासले. यावेळी गोपनिय बातमीदाराच्या आधारे अज्ञात वाहनाचा व आरोपीचा शोध घेतला असता सदरचा गुन्हा हा प्रफुल्ल उर्फ बिंदु प्रकाश पानसरे (वय २८ रा. पाटस ता.दौंड जि. पुणे) याने केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

सदर आरोपी हा वरवंड (ता. दौंड) चौकात येणार असल्याचे पोलिसांना समजताच डि.बी. पथकाने सापळा रचुन गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह आरोपीला ताब्यात घेवुन अटक केली. आरोपीकडुन गुन्ह्यात चोरलेली सोन्याची चैन व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकुण ५ लाख ५० हजार हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर गुन्ह्यातील  आरोपीस अटक करून त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुशंगाने प्राथमिक तपास केला असता आरोपीकडुन पुणे जिल्हा हद्दीमध्ये अशा प्रकारे गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

सदरची कामगिरी पुणे ग्रामिण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मागर्दर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोसई सुप्रिया दुरंदे, पोहवा. सुभाष राउत, नितीन बोराडे, पांडुरंग थोरात, शरद वारे, पोना. अमीर शेख, पोशि. अमोल देवकाते, रविद्र काळे योगेश गोलांडे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास मपोसई सुप्रिया दुरंदे या करीत आहेत.