डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
केडगाव (दौंड) : दौंड तालुक्यातील केडगाव येथे रविवार दिनांक 22/04/2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्वच जाती धर्माच्या लोकांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन केले. रोहिदादा गजरमल यांच्या भीमक्रांती मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या दिवशी रविवारी सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे पूजन यवत पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक जगदाळे, जाधव साहेब, कापरे, भोसले साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सरपंच पुनम गौरव बारवकर, अप्पासाहेब हंडाळ, शहाजी गायकवाड, नितीन जगताप, धनंजय (बापू) शेळके, दिनेश राऊत, सहकारनामा चे संपादक अब्बास शेख, संजय हंडाळ, दिनेश शेळके, तुषार शेळके सर, संदीप राऊत, स्वप्नील राऊत,अतुल गायकवाड, किरण शेळके गोरख देशमुख, वैभव हंडाळ यांसह विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
रविवारी सायंकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत शेकडो नागरिक सहभागी झाले होते. मिरवणूकीनंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडून विविध वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये रोकडे सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय करून दिला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणासाठी आणि नागरिकांच्या हक्कासाठी कश्या पद्धतीने लढा दिला याची माहिती दिली. ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी महत्वाची माहिती दिली. या कार्यक्रमाला केडगाव पंचक्रोशीतील शेकडो नागरिक उपस्थित होते. हा कार्यक्रम रोहीतदादा गजरमल यांच्या भीम क्रांती मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.