दौंड : दौंड येथील कॅनरा बँकेला महिला शाखा अधिकाऱ्याकडूनच पावणे पाच लाखांचा गंडा घालण्यात आल्याची घटना घडली आहे. स्मिता बिनोदकुमार रॉय (रा.29 टाईप 4, सेक्टर 5.ए.भेल हरिद्वार,उत्तराखंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांच्याविरोधात राजीव सिन्हा (वय 51 वर्षे व्यवसाय असि.जनरल मॅनेजर रा.कॅनरा बॅंक रिजनल ऑफीस पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि. 02/03/2022 ते 25/05/2022 चे दरम्यान आरोपीने हा सर्व प्रकार कॅनरा बॅंक शाखा दौंड जि. पुणे येथे केला असल्याचे फिर्यादित म्हटले असून तिने यामध्ये सुमारे 4 लाख 69 हजार 392 रुपयांची फसवणूक केली आहे. आरोपी स्मिता बिनोदकुमार रॉय ही कॅनरा बॅंक शाखा दौंड येथे शाखा अधिकारी म्हणून काम करीत असताना तिने दिनांक 02/03/2022 पासून ते दिनांक 25/05/2022 पर्यंत कॅनरा बॅंक शाखा दौंड चे सामान्य प्रभार खर्चाचे (जनरल चार्जेस) खाते नंबर 1) जी.एल.नंबर 420083090 व 2) जी.एल.नंबर 420030020 या खात्यावरून आपले पदाचा गैरवापर करून, स्वताच्या फायद्याकरीता वापरून, बॅंकेची आफरातफर करून वेगवेगळया खात्यावर ट्रान्सफरकरून घेवून, बॅंकेचा विश्वासघात केला.
अफरातफर केलेली एकुण रक्कम ही 4 लाख 69 हजार 392 रुपयांची अर्थिक फसवणूक केली असल्याचे आढळून आले. वरील फिर्यादीवरून आरोपी महिलेविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.