यवत : पुरंदर तालुक्यात अफू ची शेती करणाऱ्या दोन शेतकऱ्यांना पकडल्यानंतर आता दौंड तालुक्यातही तसाच प्रकार उघडकीस आला आहे. अफूची लागवड करणा-या एका इसमावर यवत पोलीसांनी आता अटकेची कारवाई केली आहे.
दिनांक ०९/०३/२०२४ रोजी यवत पोलीसांना अनिल बबन म्हस्के (वय ४२ वर्ष रा. उरूळीकांचन, पांडरस्थळ ता. हवेली जि.पुणे) याने त्याच्या दौंड तालुक्यातील डाळींब या गावातील जमीन गट नं / १७४ मधील शेतामध्ये बेकायदेशिर अफुच्या झाडांचीला गवड केली असल्याची माहिती मिळाली. सदर महितीच्या अनुषंगाने यवत पोलीसांनी सापळा रचुन अनिल बबन म्हस्के याच्या शेत जमीनीमध्ये छापा टाकला असता अनिल म्हस्के याने आठ गुंठे पुदीनाच्या क्षेत्रामध्ये काही अंतरावरील ६ सरींमध्ये सुमारे ११९ किलो १८४ ग्रॅम वजनाच्या अफुची हिरवट रंगाची बोंडे व पाने असलेली झाडे आढळून आली. या झाडांची अंदाजे किंमत २ लाख ३८ हजार ३६८ रुपये इतकी आहे. सदरचा मुद्देमाल पोलीसांनी जागीच जप्त करून यवत पोलीस स्टेशन येथे अनिल बबन म्हस्के याच्या विरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणामकरणारे पदार्थ अधिनीयम सन १९८५ चे कलम १८ (क) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक, आकाश कोंडीराम शेळके हे करीत आहेत.
सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (बारामती विभाग) संजय जाधव, उप विभागीय पोलीस दौंड विभाग स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण देशमुख (पोलीस निरीक्षक यवत पोलीस स्टेशन) यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सलीमशेख, पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके, पोलीस हवालदार ब नं २१८१ अक्षय यादव, पोलीस हवालदार ब.नं.२६५ निलेश कदम, पोलीस हवालदार ब.नं. २०८२ महेंद्र चांदणे, पो.हवा २०९४ राम जगताप, पोहवा / १३१४ नारायण वलेकर, चालक / पो.ना ६०६ आव्हाळे, पोलीस कॉस्टेबल ब.नं. २६५८ मारूती सुदाम बाराते यांच्या पथकाने केली आहे.