दौंडमध्ये मतदान यंत्र जनजागृती कक्षाची स्थापना, आगामी निवडणुकीच्या आचारसंहिते पर्यंत कक्ष सुरू राहणार – मिनाज मुल्ला

अख्तर काझी

दौंड : दौंडला स्वतंत्र प्रांत कार्यालय सुरू झालेल्या दुसऱ्याच दिवसापासून प्रांताधिकारी मीनाज मुल्ला यांनी शासनाचे विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.

आज दि.11 डिसेंबर रोजी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येथील तहसील कार्यालयामध्ये मतदान यंत्र जनजागृती कक्ष तयार करण्यात आला आहे. यावेळी प्रांताधिकारी मीनाज मुल्ला व दौंड चे तहसीलदार अरुण शेलार यांनी मतदान यंत्राची कार्यपद्धती आणि मतदान प्रक्रियेविषयी नागरिकांना माहिती दिली.

सदरचा कक्ष आगामी निवडणुकीच्या आचारसंहितेपर्यंत सुरू राहणार असल्याचे मिनाज मुल्ला यांनी सांगितले. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार गिरीश कांबळे ,दौंडचे तलाठी हरिश्चंद्र फरांदे तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी वृंद, नागरिक उपस्थित होते.