पुणे : सहकारनामा ऑनलाइन (अब्बास शेख)
सुपे येथील एका मोबाईल शॉपीतून सुमारे 9 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरणारे आरोपी अवघ्या 48 तासांत मुद्देमालासह जेरबंद करण्यात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा (LCB) ला यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि. 04 डिसेंबर रोजी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील सुपे ता.बारामती या गावच्या हददीतील नवजीवन इलेक्ट्रीक अॅन्ड इलेक्ट्रीकल मोबाईल शॉपी दुकानाचे शटर उघडुन व काच फोडुन दुकानामधील मोबाईल, एल.सी.डी टिव्ही, रोख रक्कम, चांदीचे सिक्के, मोबाईल अॅक्सेसेरीज, हातातील घडयाळ, पेनड्राव्ह असा मुद्देमाल चोरी गेलेबाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरी प्रकरणी मयुर रामदास लोणकर (वय 21 वर्षे व्यवसाय इलेक्ट्रॉनिक मोबाईल शॉपी, रा.गदादेवस्ती,सुपे ता.बारामती जि.पुणे) यांनी फिर्यादी दिली होती.
सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पुणे ग्रामिण पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख सो, अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते सो, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर सो, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोसई योगेश शेलार, पोसई शिवाजी ननवरे स्थनिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांना गुन्हा उपकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे सदर गुन्ह्याचे समांतर तपासा दरम्यान सी.सी.टी.व्ही फुटेज व गोपीनय बातमीदार यांचेकडुन बातमी मिळाली की, अतुल पोपट येडे (वय-25 वर्षे रा.लिंगाळी ता.दौड जि.पुणे) याने त्याचे साथीदारासह सदरचा गुन्हा केला आहे. त्यावरून अतुल पोपट येडे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे कसुन चौकशी केली असता त्याने मिथुन प्रकाश राठोड (वय-19
वर्षे) संदीप बाबुराव राठोड (वय-24 वर्षे) आकाश मच्छिंद्र गुजाळ (वय-२२ वर्षे) आणि 1 अल्पवयीन मुलगा सर्व रा.राघोबानगर गिरीम ता.दौंड जि.पुणे यांचे साथीने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. सदर आरोपींना तात्काळ ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन चोरीस गेलेला मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोसई गणेश कवितके, पोसई योगेश शेलार, वडगाव निंबाळकर
पोलीस स्टेशन, पोसई शिवाजी ननवरे स्थनिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सफो/पोपट जाधव, पोकॉ सलमान खान, विशाल नगरे, हिरालाल खोमणे, अक्षय सिताप, किसन ताडगे, भाउसाहेब मारकड, अमोल भुजबळ, आबा जाधव.
तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोहवा. उमाकांत कुंजीर, अनिल काळे, रविराज कोकरे, पोना/राजु मोमीन, विजय कांचन, अभिजीत एकसिंगे, पोकॉ/ धिरज जाधव या पोलीस पथकने केली असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोसई शेलार हे करीत आहेत.