Categories: Previos News

…अन्यथा 8 दिवसांत ‛त्या’ 84 दुचाकींचा दौंड पोलीस करणार ‛लिलाव’

दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

दौंड पोलीस ठाण्यात ८४ बेवारस दुचाक्या जमा आहेत. ज्या नागरिकांच्या  गाड्या चोरीला  गेलेल्या  आहेत  त्यांनी  दौंड  पोलीस स्टेशनला  येऊन  या गाड्यांची  पाहणी करावी व त्या गाड्यांमध्ये आपली गाडी आढळून आल्यास येत्या ८ दिवसांत आपला मालकी हक्क दाखवून आपली दुचाकी ताब्यात घ्यावी. अन्यथा या दुचाकी वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.

याबाबतची माहिती दौंडचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे. दौंड शहर व परिसरात बेवारस आढळून आलेल्या ८४ दुचाक्या आहेत. यापूर्वी चोरीला गेलेल्या अनेक दुचाकीच्या मालकांनी दौंड पोलीस ठाण्यात भेट देऊन कागदपत्रांची पुर्तता करून आपली दुचाकी ताब्यात घेतली आहे.

कोणाची दुचाकी चोरीला गेलेली असेल त्यांनी दौंड पोलीस ठाण्यात समक्ष भेट द्यावी असे आवाहन दौंड पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

याबाबत अधिक माहितीसाठी दौंड पोलीस ठाण्याचे कारकून पो. ना. बापु रोटे यांच्याशी ९६६५३५००९३ अथवा ०२११७-२६२३३३३ या क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती दौंड पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

7 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

20 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

22 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

24 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago