दौंडमध्ये पुन्हा 8 जण कोरोना पॉझिटिव्ह, 7 पुरुष तर 1 महिलेचा समावेश



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड शहरामध्ये कोरोनाचे लागलेले ग्रहण सुटता सुटेना असेच दिसतेय. आज पुन्हा दौंड शहरामध्ये 8 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्वजण दौंड शहरातील असून यामध्ये 7 पुरुष 1 महिलेचा समावेश आहे. एकूण 42 जणांचे स्वॅब घेऊन ते पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 41 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून 1 अहवाल पेंडिंग आहे. याबाबत उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी माहिती दिली असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.