भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, 8 जणांचा मृत्यू तर 100 जण अडकल्याची भीती



मुंबई : वृत्तसेवा – सहकारनामा  ऑनलाईन

मुंबई येथील भिवंडी परिसरात मध्य रात्रीच्या सुमारास शहरातील पटेल कंपाऊंडमधील जिलानी हि तीन मजली इमारत कोसळून सुमारे 8 जण ठार तर 100 जण आतमध्ये अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. या मोठ्या दुर्घटनेबाबत ANI नेही वृत्त दिले आहे.

पहा भिवंडी दुर्घटनेचे Live अपडेट

हि दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच पोलीस आणि NDRF च्या टीम घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मदत कार्य सुरू केले होते.

https://twitter.com/ANI/status/1307852003175882759?s=08

यावेळी कोसळलेल्या इमारतीखाली अगोदर 25 लोक अडकल्याचा अंदाज व्यक्त होत होता. त्यातील 5 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले होते. तर 9 जण जखमी असल्याची माहिती मिळत होती. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार यात 8 जण ठार तर 100 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

हि इमारत ज्या परिसरात आहे तेथे पाऊस सुरू असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. जखमींना भिवंडीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.