Categories: Previos News

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कंपनीतून 75 लाखांच्या पावडरची चोरी, एका कामगावर गुन्हा दाखल



|सहकारनामा|

दौंड : कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक वसाहती मधील एका केमिकल कंपनी मधून चोरट्यांनी 75 लाख रुपयांच्या केमिकल  पावडरची चोरी केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी कंपनीच्या वतीने उमाजी रेडकर यांनी फिर्याद दिली असून कंपनीतील कामगार सुनील ज्ञानदेव भंडलकर (रा. मळद, दौंड) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक 22 जुलै ते 29 जुलै रोजी च्या दरम्यान कुरकुंभ येथील मोडीप्रो इंडिया प्रा. लि. कंपनीतील, 50 लिटरच्या तीन ड्रम मध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवलेली 75 किलो वजनाची ( किं.75 लाख रू.) ब्रिन्झ-7 ही पावडर कंपनीतील कोणीतरी कामगाराने चोरून नेली आहे. कंपनीतील कामगार सुनील भंडलकर याने सदरची चोरी केली असावी या संशयाने त्याच्याविरोधात दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Sahkarnama

Recent Posts

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

4 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

24 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago