मुंबई : सहकारनामा
2020 सालामध्ये संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूचे संकट कमी होत असताना पुन्हा एकदा 2021 साल सुरू होत असताना नव्या कोरोना विषाणूने भारतातही डोके वर काढायला सुरुवात केली आहे.
ब्रिटनमधून भारतात परतलेल्या 6 प्रवाश्यांमध्ये नविन कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आले असून यात महाराष्ट्रातील 3 जण असल्याने राज्यातील चिंता वाढली आहे.
नविन कोरोना विषाणू पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 3 जणांची बेंगळुरूतील एन आय एम एच ए एन एस मध्ये, 2 जण हैदराबादमधील सी सी एम बी मध्ये तर एक जणाची पुण्यातील एन आय व्ही लॅबमध्ये टेस्ट करण्यात आली यात हे 3 जण पॉझिटिव्ह आढळून आले.
हे सर्व रुग्ण भारतातील असून ते इंग्लंड आणि ब्रिटनहून प्रवास करून पुन्हा भारतात आले आहेत. या रुग्ण प्रवाशांमध्ये औरंगाबाद 1, नागपूर 1, आणि कल्याणमधील 1 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.