सिल्वर ओक’ मधील 4 जणांना कोरोना, जेष्ठ नेते शरद पवारांबाबतही आली मोठी माहिती समोर



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

देशात आणि राज्यात कोरोना व्हायरसचे थैमान सुरूच आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सरकारची डोकेदुखी सुद्धा वाढत चालली आहे. याच कोरोनाच्या धामधुमीत एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. 

ही बातमी मुंबईतून येत असून या बातमीनुसार देशाचे माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील असणाऱ्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानातील ‛चार’जणांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. या वृत्ताला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही दुजोरा दिला आहे. या सर्व घटनेमध्ये एक मात्र समाधानकारक बाब असून शरद पवार यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे, तर सिल्वर ओक निवासस्थानातील चार जणांची कोरोना टेस्ट मात्र पॉझिटिव्ह आली आहे. 

आज सिल्वर ओकवर कोरोनाबाबत आलेल्या वृत्तानंतर  राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मोठी चिंता वाढली होती. मात्र आता खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शरद पवार यांना कोरोना नसून निवासस्थानातील चौघांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे स्पष्ट केले आहे.