काय सांगता… यवत पोलीस ठाणे हद्दीत दरोडा टाकून तब्बल 41 वर्षे राहिला तो फरार, मात्र पुणे ग्रामिण LCB ने त्याला अखेर गाठलेच



पुणे : यवत पोलीस ठाणे हद्दीत दरोडा टाकून तब्बल 41 वर्षे एक आरोपी पोलिसांना चाकवत फरार राहिला, मात्र अखेर पुणे ग्रामिण LCB ने त्याला गाठून जेरबंद केले आहे.

दि १५/९/२०२१ रोजी मा पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील वॉन्टेड फरार आरोपी यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. 

वरील आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक  जुने रेकॉर्ड वरील फरार आरोपी यांचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहिती वरून यवत पोलिस स्टेशन गु र नं 25/ 1980 भा द वी 395 या गुन्ह्यातील आरोपी अंकुश माणिक गायकवाड (वय 58 वर्षे रा खडकी ता:-करमाळा जि:-  सोलापूर) हा गुन्हा घडले पासून तब्बल ४१ वर्षे फरार होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास सापळा रचून करमाळा खडकी रोडवर जनावरे चरायला घेऊन फिरत असताना  शिताफीने ताब्यात घेतले आहे. सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने वरील गुन्हा केला असल्याचे सांगितलेवरून त्यास पुढील तपास करीता वैद्यकीय तपासणी करून यवत पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे .

सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख सो यांचे नेतृत्वाखाली अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके, पो उप निरीक्षक शिवाजी ननवरे, पो हवा विजय कांचन, पो कॉ धिरज जाधव, पो कॉ दगडू विरकर यांनी केली आहे