दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड तालुक्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. तालुक्यातील वाड्यावस्त्या आणि गावांमध्ये आता कोरोनाची बहू संख्येने रुग्ण सापडू लागले आहेत. कोरोनाला पायबंद घालण्यासाठी आता नागरिकांनीच दक्ष राहण्याची वेळ आली आहे.
आज प्राप्त अहवालानुसार दौंड शहरामध्ये 15 तर ग्रामीण भागामध्ये 25 असे एकूण 40 जण कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत.
याबाबत दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रासगे आणि यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. इरवाडकर यांच्याकडून मिळालेल्या अहवालानुसार उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 21/8/20 रोजी एकुण 50 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट आज दिनांक 22/8/20 रोजी प्राप्त होऊन त्या पैकी एकूण 15 व्यक्तीचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत तर 35 व्यक्तीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह मध्ये
10 महिला आणि 5
पुरूष पुरुष असून दौंड शहर – 4, ग्रामीण – 10, Srpf 1 अशी आकडेवारी आहे. यातील रुग्ण हे शालिमार चौक 1, भवानी नगर 1, बालाजी नगर 1, बोरावके नगर 4, जगदाळे वस्ती 3, साठे नगर 1, सावरकर नगर 3, Srpf ग्रुप 7 – 1 असे असून बाधित रुग्णांचे वय 2 ते 63 वर्ष दरम्यान आहे.
दौंड ग्रामीण मध्ये पुन्हा धुमाकूळ…
पाटस 4, नानविज 1, देऊळगाव राजे 2, यवत 5, बोरीपार्धी 3, उंडवडी 4, वरवंड 1, डाळिंब 1, वाळकी 3, डुबेवाडी 1, असे एकूण 25 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या मध्ये 21 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. या सर्वांचे वयोमान 7 वर्षे ते 67 वर्षे या दरम्यान आहे.