दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. आज दि.29 जुलै रोजी पुन्हा 4 कोरोना बाधित रुग्ण सापडले असून हे सर्व रुग्ण राहू, कानगाव, भांडगाव या गावातील आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार भांडगाव 2, राहू 1, कानगाव 1 असे 4 रुग्ण सापडले आहेत.
दौंड तालुक्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यबाबत चिंता वाढत चालली आहे.