बापरे.. एकाच चोरट्याने लांबीविल्या 4 लाखाच्या 11 दुचाक्या, हडपसर पोलीसांनी मुद्देमालासह सराईत चोरटा केला जेरबंद



|सहकारनामा|

पुणे :  पुणे शहरातून तब्बल ११ मोटर सायकल ज्यामध्ये होन्डा ड्रिम युगा- १, अॅक्टीवा ५ जी – १, पॅशन प्रो – ३, सुझुकी एक्सेस- १, बजाज पल्सर-२, हिरो होन्डा स्प्लेन्डर – ३, असा एकुण ४ लाख रु कि.च्या गाड्या चोरणाऱ्या सराईत चोरट्यास मुद्देमालासह पकडून त्याकडून ११ दुचाक्या मिळविण्यास हडपसर पोलीसांना यश आले आहे.

हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहनचोरीच्या घटनेत वाढ झाल्याने मा.वरिष्ठांच्या आदेशाने व मार्गदर्शानुसार गणेशोत्सव व गुन्हे प्रतिबंध अनुशंगाने दिलेल्या सुचनाप्रमाणे दिनांक- १०/०९/२०२१ रोजी सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, पोलीस अंमलदार

प्रदिप सोनवणे, समीर पांडुळे, शशिकांत नाळे, प्रशांत टोणपे, शाहिद शेख, रियाज शेख, निखील पवार, प्रशांत दुधाळ असे मिळुन हडपसर पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार प्रशांत टोणपे, शाहिद शेख, रियाज शेख, यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, “एक इसम लाल काळ्या रंगाची हिरो होंडा पॅशन प्लस चोरीची दुचाकी गाडी घेवून ग्लायडिंग सेंटर जवळ, तुकाई दर्शन पायथ्यालगत भेकराईनगर याठिकाणी थांबलेला आहे” वगैरे बातमी मिळालेल्या बातमी बाबत वपोनि श्री. बाळकृष्ण कदम यांना कळविली असता, त्यांनी स्टाफसह जावून खात्री करुन, योग्य ती कारवाई करणेबाबत मुफजल आदेश दिल्याने, वर नमुद स्टाफ व पंचनामा किटसह ग्लायडिंग सेंटर जवळ, तुकाई दर्शन पायथ्यालगत, भेकराईनगर, पुणे या ठिकाणी गेले असता, मिळालेल्या बातमीप्रमाणे वर्णनाचा इसम सदर याठिकाणी गाडीवर बसलेला मिळुन आला. त्यास स्टाफचे मदतीने पकडून, ताब्यात घेवून, सदर इसमास त्याचे नाव पत्ता विचाले असता त्याने आपले नाव – यशदिप गोविंद कोंडार (वय २२ वर्षे, राहणार- शिवशक्ती चौक, गंगानगर, गुरुदत्त कॉलनी, लेन नंबर-८, फ्लॅट नंबर७. तिसरा मजला, भेकराईनगर, हडपसर, पुणे मुळ राहणार- चाळ नंबर-१०, त्रिसंगम सोसायटी, नंदादिपनगर, मृणाली रोड, चक्की नाका, कल्याण ईस्ट ठाणे) असे असल्याचे सांगितले. 

सदर इसमाकडे त्याचे ताब्यात मिळुन आलेल्या दुचाकी गाडीचे कागदपत्राबाबत विचारले असता, तो उडवाउडवीची

उत्तरे देवू लागला, सदर गाडीचे इंजिन नंबर व चॅसिज नंबर वरुन गाडीची पडताळणी करता. सदरील गाडीचा मुळ आर.टी.ओ. क्रमांक- MH12 EC-8978 असा असल्याचे व सदरील गाडी चोरीबाबत

हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं.७३५/२०२१ भा.द.वि. कलम- ३७९ अन्वये गुन्हा नोंद असल्याचे निष्पन्न झाल्याने, सदर आरोपीचे ताब्यात मिळुन आलेली दुचाकी गाडी, जप्त करण्यात आलेली आहे. सदर आरोपीकडे अधिक तपास करता त्याचेकडे विविध पोलीस स्टेशनकडील खालील गुन्हे उघडकीस आले असुन त्या गुन्हयामधील वाहने जप्त करण्यात आलेले आहे.

१) हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं.७३५/२०२१ भा.द.वि. कलम- ३७९

२) हडपसर पोलीस स्टेशन गुरनं- ७२६/२०२१ भादविक ३७९

३) हडपसर पोलीस स्टेशन गुरनं- ७३८/२०२१ भादविक ३७९

४) हडपसर पोलीस स्टेशन गुरनं- ७२५/२०२१ भादविक ३७९

५) हडपसर पोलीस स्टेशन गुरनं- ६४१/२०२१ भादविक ३७९

६) चंदननगर पोलीस स्टेशन गुरनं- २५९/२०२१ भादविक ३७९

७) बंडगार्डन पोलीस स्टेशन गुरनं- ०९/२०२० भादविक ३७९

८) बंडगार्डन पोलीस स्टेशन गुरनं- ३१४/२०१८ भादविक ३७९

९) विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गुरनं- १४१/२०२१ भादविक ३७९ वरील प्रमाणे ०९ वाहन चोरीचे गुन्हे उघड झाले असुन त्यांच्या ताब्यातून एकुण ०९ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असुन असा एकुण ४,००,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. व इतर दोन मोटार सायकलचा मालकांचा शोध घेण्याचे काम चालु आहे. तसेच त्यांचे इतर कोणी साथीदार आहेत काय याचा शोध घेतला जात आहे.

सदरची कामगिरी ही मा.श्री.नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व

मा. नम्रता पाटील, पोलीस उप आयुक्त,परिमंडळ ५ पुणे शहर, यांचे सुचना व मागदर्शनाखाली मा.श्री.

कल्याणराव विधाते, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. राजु अडागळे, पोनि.(गुन्हे) श्री. दिगबंर शिंदे

पोनि (गुन्हे) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस

उप निरीक्षक सौरभ माने, पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे, गणेश क्षिरसागर, पोलीस नाईक अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, शशिकांत नाळे, सचिन जाधव पोलीस शिपाई शाहीद शेख, रियाज शेख, प्रशांत टाणपे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, सचिन गोरखे, सुरज कुंभार यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.