जबरी चोरी प्रकरणात 4 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला दौंड पोलिसांनी केले जेरबंद



दौंड : जबरी चोरी प्रकरणात मागील चार वर्षापासून फरार असलेल्या नितीन पोपट केंगार या आरोपीला पकडण्यात दौंड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. केंगारच्या विरोधात पाच गुन्हे दाखल असून तो मागील चार वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता. पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी विविध गुन्ह्यात फरारी आरोपींविरोधात विशेष मोहीम राबवून त्यांना अटक करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने येथील गुन्हे शोध पथक सध्या फरारी आरोपींच्या मागावर आहेत. दि.30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर रोजी सुद्धा याच पथकाने कोम्बिंग ऑपरेशन राबवून दरोडा व खंडणीच्या गुन्ह्यामध्ये तीन वर्षापासून फरार असलेल्या आरोपींना अटक केली होती. 

पो. नि. विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पो. उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पो. कर्मचारी सुभाष राऊत, अमोल गवळी, किरण राऊत, आदेश राऊत, अमोल देवकाते यांच्या पथकाने सदरची कामगिरी बजाविली.