|सहकारनामा|
दौंड : (पाटस)
दौंड तालुक्यातील उत्कर्ष शिक्षण संस्था कुसेगावचा ३२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार राहुल कुल यांना महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र विधिमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाद्वारे सन २०१७-१८ चा अधिकृत ‘आदर्श संसदपटू’ पुरस्कार मिळाल्या बद्दल तसेच आरोग्यदूत म्हणून कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल उत्कर्ष शिक्षण संस्थेच्या वतीने आमदार राहुल कुल यांना सन्मानित करण्यात आले. कुसेगाव येथील श्री भानोबा विद्यालयात हा कार्यक्रम सोहळा पार पडला. विद्यालयाच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाला सुरवात झाली,यावेळी उत्कर्ष शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य केशवराव आनंदराव शितोळे यांना आमदार राहुल कुल आणि ग्रामस्थ यांच्या हस्ते सत्कार करून गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशांत तात्या शितोळे होते.
संस्थेच्या कुसेगाव येथील श्री भानोबा विद्यालयास भूमिदान देणारे बाबादादा चव्हाण, जालिंदर चव्हाण, जिजाबा चव्हाण,राजेंद्र चव्हाण, सुनील चव्हाण, विशाल चव्हाण या बंधूंचा तसेच मच्छिंद्र केकाण, तानाजी केकाण,भरत केकाण, शरद केकाण , विठ्ठल केकाण, अर्जून केकाण, यांचा सत्कार आमदार कुल यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच शाळेस स्वागत कमान बांधून देणारे कांचनताई शंकरराव बारवकर,पाण्याची टाकी बांधून देणारे बाळासाहेब जयवंत शितोळे यांचा सत्कार गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह शितोळे यांनी स्वीकारला. यावेळी आमदार राहुल कुल, उत्कर्ष शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल शितोळे,सचिव सचिन शितोळे सर, सल्लागार डॉ.हरिभाऊ भापकर सर,उपसरपंच डॉ. अमोल शितोळे, माजी सरपंच मनोज फडतरे, पोलीस पाटील गणेश शितोळे, माजी उपसरपंच मनेश शितोळे, विजयसिंह शितोळे, दादासो शितोळे, विकास शितोळे,विजय शितोळे, भाऊसाहेब शितोळे डॉ.आव्हाड,पाटसचे माजी सरपंच संभाजी खडके, दादा केसकर, तानाजी (तात्या) केकाण, मुख्याध्यापक विनायक सुंबे,सिप्लाचे संदीप शितोळे,आहेर साहेब,त्रिंबक शितोळे,प्राचार्य नानाससाहेब भापकर तसेच संस्थेतील शिक्षक वृंद आणि कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
मनोज फडतरे, विजयसिंह शितोळे, गुरुवर्य केशवराव शितोळे सर व आमदार राहुल दादा कुल यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन शितोळे, सुत्रसंचलन शितोळे बी.डी यांनी केले तर आभार संदीप शिंदे यांनी मानले.