पाटस येथील विद्युत टॉवर तोडून सरकारी मालमत्तेचे 3 कोटी 50 लाखांचे नुकसान करणाऱ्या 2 आरोपींना यवत पोलिसांकडून अटक, मिळाली ‛इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी



दौंड : दौंड तालुक्यातील पाटस येथे महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी म्हणजेच  महापारेषण या सरकारी कंपनीचे 3 टॉवर अज्ञात इसमांनी तोडून ते जमीनदोस्त केल्याची घटना काल घडली होती. यात  सरकारी मालमत्तेचे सुमारे 3 कोटी 50 लाख रूपयांचे नुकसान झाले होते. मात्र यवत चे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी युद्ध पातळीवर या घटनेचा तपास करून या गुन्ह्यातील 2 आरोपींना  अटक केली आहे. 

प्रदीप माणिक खारतोडे आणि संजय बापू गाढवे (दोघे रा. खारतोडेवस्ती, पाटस, ता.दौंड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून  पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि त्यांच्या यवत, पाटस पोलीस स्टाफने रात्री 1 वाजण्याच्या सुमारास या आरोपींना मोठ्या शिताफीने पकडले आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

दौंड तालुक्यातील पाटस येथे महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी म्हणजेच   महापारेषण या सरकारी कंपनीचे 3 टॉवर अज्ञात इसमांनी तोडून ते जमीनदोस्त केल्याची घटना घडली होती. यात सरकारी मालमत्तेचे सुमारे 3 कोटी 50 लाख रूपयांचे नुकसान झाले होते. याबाबत विठठल मारूती कांबळे (व्यवसाय नोकरी,वय ४५, रा.सध्या, गोपाळवाडी ता.दौंड) यांनी फिर्याद दिली होती.

कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि.१२ सप्टेंबर ते दि.१३ सप्टेंबरच्या मध्य रात्री कोणीतरी अज्ञात इसमांनी पाटस ता.दौंड येथील जमीन गट नं.११४६ मध्ये महाराष्ट्र शासन, महापारेषण महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनीचे सरकारी 3 विद्युत टॉवर  कशाच्यातरी सहाय्याने जमीनीपासून कट करून टॉवर खाली पाडून सरकारी मालमत्तेचे अंदाजे साडे तीन कोटी रूपयांचे नुकसान केले असल्याचे नमूद करण्यात आले होते.