|सहकारनामा|
दौंड : (अख्तर काझी)
दौंड शहरातील विविध विकास कामांकरिता जिल्हा वार्षिक योजना २०२०- २१ सुवर्णजंयती नगरोत्थान अंतर्गंत ५८ लक्ष ४० हजार रूपये निधी मंजूर झाला असल्याची माहीती जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य वीरधवल जगदाळे व बादशहा शेख यांनी दिली. या कामांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांनी विकास कामांसाठी तात्काळ निधी मंजूर केला.
या कामांमध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे उद्यानामध्ये विविध विकास कामे व दूरूस्ती करणे या कामासाठी २७ लक्ष रूपये मंजूर झाले आहेत.या कामासाठी लो.आण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा समितीचे अध्यक्ष आबासाहेब वाघमारे यांनी निधीसाठी मागणी केली होती. तसेच प्रभाग १२ मधील मुख्य रस्त्यांसाठी ३० लक्ष रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामासाठी नगरसेविका ज्योती राऊत यांनी निधीची मागणी केली होती.
या दोन्ही कामांच्या प्रशासकीय मंजूरीचे पत्र देण्यात आले.या प्रसंगी दौंड न.प. चे उपनगराध्यक्ष विलास शितोळे,आबासाहेब वाघमारे, नगरसेवक इंद्रजीतजगदाळे, गटनेते राजेश गायकवाड,सोहेल खान,गुरुमुख नारंग,नगरसेवक संजय चितारे,अजय राऊत,अनिल साळवे, आनंद बगाडे उपस्थित होते.