‛कर्नाटक’च्या ‛गुलबर्गा’मध्ये भूकंपाचे धक्के

कर्नाटक :
कर्नाटकातील गुलबर्गा येथे भूकंपाचे धक्के बसले आहेत. सोमवारी रात्री 09:54 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले असून रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.1 इतकी सांगण्यात आली आहे. ANI ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

या अगोदर रविवारी सुद्धा कर्नाटकच्या कलबुर्गीमध्ये 3.0 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले होते. कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती निरीक्षण केंद्राने (केएसएनडीएमसी) ही माहिती दिली आहे. केएसएनडीएमसीने सांगितले की कलबुर्गी येथे सकाळी 6.05 वाजता भूकंप आला आणि त्याचा केंद्रबिंदू जिल्ह्यातील कलागी तालुक्यातील कोडादूरपासून दोन किलोमीटर ईशान्येस असल्याची माहिती दिली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा मालमत्ता हानी झाली नाही. केएसएनडीएमसीने म्हटले आहे की या प्रकारच्या भूकंपामुळे स्थानिक पातळीवर कोणतेही नुकसान होत नाही, परंतु स्थानिक पातळीवर सौम्य हादरे जाणवू शकतात. या भूकंपामुळे घाबरण्याची गरज नाही कारण याची तीव्रता खूप कमी आहे, त्यामुळे याच्यापासून धोका संभवत नाही.