दुचाक्या चोरणाऱ्या दोघांकडून 2 मोटारसायकल जप्त, (LCB) स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई



पुणे : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांचे अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री डॉ.अभिनव देशमुख  यांनी सदर मोटारसायकल गुन्ह्यांचा तपास करून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.

त्यानुसार लोणावळा उपविभाग हद्दीत मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे उद्देशाने पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, 3 इसम  १) अजय अरुण काटकर (वय-21वर्ष) २) किरण रानु चोरगे (वय 26 वर्ष) ३) गणेश गायकवाड उर्फ कांबळे उर्फ ढगे  (सर्व राहणार टाकवे बु. ता.मावळ, जिल्हा पुणे) यांचेकडे चोरीच्या 2 मोटरसायकल असून ते कमी पैशांमध्ये सदर मोटार सायकलींची विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत आहेत व सदर टुव्हीलर या त्यानी जांभूळ गावचे हद्दीत टाकवे बु.गावाकडे जाणारे रोडवर रेल्वे गेटचे अलीकडे आडोशाला लावून त्याठिकाणी बसून आहेत. अशा मिळालेल्या बातमीवरून  सदर ठिकाणी  स्टाफसह सापळा रचून  मोटरसायकली व वरील इसम अक्र 1 ते 2 यांना हिरो होंडा पॅशन व होंडा क्लिक स्कुटी (नंबरप्लेट नसलेल्या)  ताब्यात घेऊन 80 हजाराच्या2 मोटर सायकल हस्तगत करून घेतल्या आहेत. 

यातील आरोपी अक्र 3 नामे गणेश गायकवाड उर्फ कांबळे उर्फ ढगे (रा.टाकवे) हा फरार आहे. सदरच्या मोटर सायकल आरोपींनी हिंजवडी पोलिस स्टेशन व वाकड पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी केल्याचे सांगितले आहे. सदर बाबत

१) वाकड पोस्टे गु.र.नं.514/     

      2021 भा.द.वी.कलम 379  

२) हिंजवडी पो स्टे गु.र.नं.396/ 

     2021 भा द.वी.कलम 379

प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

सदर आरोपींची वैदकीय तपासणी करून पुढील कारवाई साठी हिंजवडी व वाकड पोस्टे पिंपरी चिंचवड शहर यांचे ताब्यात दिले आहे.

 सदरची कामगिरी ही मा .पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो, पोलीस निरीक्षक श्री अशोक शेळके यांचे मार्गदर्शनाखाली पो उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे सफौ. प्रकाश वाघमारे, पोहवा मुकुंद आयचीत, पोहवा. सुनील वाणी, पोहवा. दत्तात्रय तांबे, पोशी प्राण येवले यांनी केली.