अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर यांना प्रतिभा फाउंडेशनतर्फे 2 हजार मास्क,1 हजार हॅन्डग्लोजचे वाटप



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

‛कोरोना’व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर यांना योग्य त्या सूचना देऊन त्यांच्याकडून नागरिकांमध्ये जनजागृती आणि खबरदारीचे उपाय करवून घेतले जात आहेत. मात्र हे सर्व करत असताना हे शासकीय, निमशासकीय कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून जे हे काम करत आहेत ते मात्र समाजाकडून दुर्लक्षित राहत असल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.



 नेमकी हीच गरज ओळखून प्रतिभा फाउंडेशन पुणेच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी आज त्यांच्यावतीने 2 हजार मास्क आणि 1 हजार हॅन्डग्लोजचे वाटप या अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर यांना केले. दौंड पंचायत समिती आरोग्य विभाग यांच्या मार्फत दौंड तालुक्यात करोना व्हायरसच्या धर्तीवर सर्वे करण्यात येत असूूून या कामासाठी आशा वर्कर्स, आरोग्य कर्मचारी, अधिकारी हे आपला जीव धोक्यात घालून सदर सर्वे करत आहेत त्यामुळे या अधिकाऱ्यांचे,  कर्मचाऱ्यांचे आणि आशा वर्करचे आरोग्य चांगले राहावे यासाठी हा उपक्रम प्रतिभा फाउंडेशनच्या वतीने राबविला जात असल्याचे प्रतिभा फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशालीताई नागवडे यांनी सांगितले. त्यांच्या हस्ते दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजगे 2 हजार मास्क आणि 1 हजार ग्लोज सुपूर्त करण्यात आले. यावेळी दौंड तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास खळदकर उपाध्यक्ष दत्ता हंडाळ, विक्रम साबळे, आरोग्य निरीक्षक आसिफ सय्यद इत्यादी मान्यवर उपस्थित होते.