Categories: क्राईम

दमदाटी, शिवीगाळ केल्याचा आरोप करत 17 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

दौंड : दौंड तालुक्यातील पाटस येथे शिवीगाळ आणि दमदाटी केल्यामुळे 17 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि.6 मार्च 2024 रोजी रात्री 10 वाजता घडल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले असून तब्बल पाच महिन्यानंतर म्हणजे 5 ऑगस्ट 2024 रोजी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वर नमुद तारीख वेळी व ठिकाणी फिर्यादी नाजुका बापू मोरे (रा. देऊळगाव गाडा, ता. दौंड) यांनी यवत पोलिस स्टेशनला फिर्याद दिली की केडगाव, बोरी,दापोडी येथील आरोपी यांनी फिर्यादी व फिर्यादी यांच्या वडिलांस जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

त्यामध्ये आरोपिनी अ‍ॅट्रोसिटी गुन्ह्याला मी घाबरत नाही. तुला काय करायचे आहे ते कर, तुमचे हात पाय तोडून टाकु असे म्हणून बाजूस सर्व आरोपींनी फिर्यादीचे कुटुब संपवून टाकेन असे म्हणून सर्वांनी जिवे मारण्याची धमकी दिली असे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

4 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

3 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago