दौंड : सहकारनामा ऑनलाईन
– कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे बनले आहे. या विषाणूपासून वाचायचे असेल गरज नसताना नागरिकांनी बाहेर पडणे टाळायला हवे मात्र तसे होताना दिसत नसून शासकीय आदेशाची पायमल्ली करून मोकाटपणे बाहेर फिरणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी आता पोलिसांनीही कंबर कसली असून यवत, केडगाव, बोरीपारधी येथे आज यवत पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाई करत सुमारे १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
अनेकवेळा पोलिसांनी सूचना देऊनही बेफिकीरपणा करणाऱ्यांना यवत पोलिसांनीही जशास तसे उत्तर देत या १३ युवकांवर कलम१८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी या युवकांबाबत माहिती देताना यवत, केडगाव, बोरीपारधी या ठिकाणी लॉकडाउन आदेशाचे पालन न करता मोकाटपणे फिरत असलेल्या सुजित राजाराम करडे, संतोष बजरंग लोकरे, प्रसाद अशोक रोकडे (रा.यवत) सुदाम बाळू चव्हाण, सुभाष बबन ताडगे, उमेश मछिंद्र देशमुख, दत्तात्रय प्रेमा जाधव, (रा.बोरीपारधी) चौफुला येथील शेखर विलास राजगुरू तसेच केडगाव येथील अमोल पोपट जाधव, रमेश तुकाराम सूळ, गणेश रामदास सरोदे, महेश दादासो गरदडे, किरण माणिक सरोदे या सर्वांना ड्रोन व पेट्रोलिंग करताना पकडण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले.