थेऊर : सहकारनामा ऑनलाईन(शरद पुजारी)
– संपुर्ण देश कोरोना संकटाच्या विळख्यात सापडला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाशी सामना करण्यासाठी २१ दिवस लॉकडाऊन जाहीर केले. ज्यामुळे कोरानाचे संकट संपुष्टात येईल. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वजण घरी आहेत. सर्वांनी या संकटाचा धेर्याने मुकाबला करावयाचा आहे. परंतु लोणी काळभोरमध्ये अशी बरीच गरीब, कष्टकरी, उदरनिर्वाहासाठी बाहेर गावावरून आलेली कुटुंब आहेत ज्यांचे हातावरचे पोट आहे त्यांना दिवसभर कष्ट केल्या शिवाय रात्रीचे जेवनहि मिळत नाही, अशा कुटुंबावर २१ दिवस घरात रहावे लागणार असल्याने उपासमारीला सामोरे जावे लागत आहे म्हणून या सर्व कुटुंबा करिता माणुसकी व सामाजिक बांधिलकी आणि आपले कर्तव्य म्हणून ग्रीन फाउंडेशन लोणी काळभोर तर्फे अशा १२० गरीब कुटुंबाचा २१ दिवसाच्या उदरनिर्वाहासाठी अन्नधान्याच्या स्वरुपात शिधा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अध्यक्ष अमित जगताप यांनी दिली.
यामध्ये प्रत्येक कुटूंबाला गहू, साखर, तेल,तांदुळ,चहापावडर,,चटनी,डाळी,साबन, कोलगेट,मसाले.तसेच भाजी मध्ये वांगी,बटाटा, टोमॅटो, कोथिंबीर मेथी या स्वरूपात मदत करण्यात येत आहे .यासाठी बाळासाहेब कोळपे, अनिष काळभोर, विनोद राईज, अभिजीत काळभोर, महेश काळभोर, अजय काळभोर, आकाश काळभोर, अभिजीत बडदे , गणेश कांबळे, अमिर सय्यद, प्रितम पाटील, महेश इंदलकर ,अजित जगताप , विजय बोडके, विजय सकट , ओमकार देसर्डा, अमित कुंभार, राहुल कुंभार, किरण भोसले, किरण मगर, कृष्णा देठे , यांचे सहकार्य लाभले आहे.