Categories: Previos News

केडगावमध्ये मटका अड्डयावर धाड, 11 जण पोलिसांच्या ताब्यात



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड तालुक्यातील केडगाव येथे दिनांक 27/ 11/ 2020 रोजी मटका अड्ड्यावर यवत पोलिसांनी धाड टाकून 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  विशाल हॉटेलच्या भिंतीच्या आडोशाला काही इसम मटका घेत असल्याची पोलिसांना खबर मिळाली होती. यावेळी यवत पोलिसांनी मटका बुकिंग घेणारे 3 जण तसेच तेथे मटका खेळणारे 7 जण असे एकूण 11 जणांना ताब्यात घेतले.

यवत पोलिसांनी मटक्याचा खेळ खेळवताना व खेळताना आरोपी मिळून आल्याने त्यांना मुंबई मटका जुगार कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपीकडून 14,390/- रुपयांची रोख रक्कम मिळून आलेली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, पोलीस उप अधीक्षक राहुल धस, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस हवालदार बगाडे, पोलीस नाईक दशरथ बनसोडे, संतोष पंडित, संजय नगरे, नारायण जाधव, तात्या करे, राम जाधव यांच्या पथकाने केलेली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बागडे करत आहेत

Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

5 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

21 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

4 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 दिवस ago