दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अब्बास शेख)
– दौंड तालुक्यातील यवत येथे बारामती क्राईमब्रँचच्या पथकाने जोरदार कारवाई करत सुमारे 11 लाख 36 हजारांचा गुटखा तसेच गुटखा वाहतूक करणारी 5 लाखाची पिकअप असा सुमारे 16 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, बारामती विभागाचे अप्पर पोलीस, अधीक्षक (आय.पी.एस) जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँचचे
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा, पवार, विशाल जावळे, तसेच बारामती उपविभागीय कार्यालयाचे पो हवा. रमेश केकान, यवत पोलीस स्टेशन चे पोलिस जवान सोमनाथ सुपेकर, नारायण जाधव यांनी कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना गोपनीय माहिती द्वारे यवत शहरामध्ये गुटख्याच्या मोठा साठा करून तो यवत शहरात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पिकअप वाहनाने सप्लाय करून विक्री करत असल्याची खबर मिळाली होती. सदर इसमाची आणि त्याचे गोडाऊन ची माहिती घेऊन त्या ठिकाणी रेड करणे करीत बारामती क्राईम ब्रँचचे प्रमुख पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मीना यांनी आदेश दिले असता त्यांनी त्या अनुषंगाने यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये यवत शहरात मलभारे वस्ती येथे गोपनीय रित्या जाऊन माहिती घेऊन बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस जवान आणि यवत पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि पोलीस जवान यांच्यासह अचानक छापा टाकला असता सदर ठिकाणी राजेंद्र गणपत मलभारे (रा. मलभारे वस्ती, यवत, तालुका दौंड, जिल्हा पुणे) हा 11,36,058 रु किमतीचा विमल, महेक, आर.एम.डी तुलसी, नावाचा गुटखा आणि 5 लाखाच्या पिकअप गाडी असा एकूण 16,36,058 रुपयांचा
गुटखा व वाहन बेकायदेशीर रित्या बाळगून बेकायदेशीरपणे विक्री करण्याचे उद्देशाने मिळून आला असून त्याचे ताब्यातून वरील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अन्न आणि औषध प्रशासन, पुणे यांना कळविले असून यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.