दौंड : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त, हर घर तिरंगा अभियानांतर्गत दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, दौंड पोलीस स्टेशन व यवत पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड येथे दहा किलोमीटर धावणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. येथील बोरावके नगर ते दौंड शुगर कारखाना(10 कि. मी.) असे या स्पर्धेसाठी अंतर ठरविण्यात आले होते. स्पर्धेमध्ये 50 धावपटूंनी (5 पो. अधिकारी, 2 महिला पो. क. व 43 पो. क.) भाग घेतला. स्पर्धेत दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अमीर शेख यांनी दहा किलोमीटर साठी 38 मिनिटांची वेळ नोंदवीत प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पटकाविली.
दौंड पोलीस स्टेशनचे पो. निरीक्षक विनोद घुगे, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना दौंड मधील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. डी. एस. लोणकर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
स्पर्धेचा निकाल-
प्रथम क्रमांक- अमीर शेख(38 मी.दौंड पोलीस स्टेशन)
द्वितीय क्रमांक- संदीप जाधव(39 मी. दौंड पोलीस स्टेशन)
तृतीय क्रमांक- सुभाष डोईफोडे(40 मी. दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय).