आता घरी बसून बनवा फक्त 10 मिनिटांत पॅनकार्ड, पॅनकार्ड बाबत केंद्राकडून महत्वाची योजना



दिल्ली : सहकारनामा ऑनलाईन

– केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेसाठी उपयुक्त ठरेल अशा योजना राबवून त्यांना सुविधा पुरवत नागरीकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. अशीच एक सुविधा काल देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पॅनबाबत जाहीर केली असून त्यामुळे तात्काळ स्वरूपात ऑनलाइन पॅन मिळवणे आता खूपच सोपे झाले आहे. काल सुविधा निर्मला सीतारामन यांनी लाँच केली आहे. याबाबत CBDT ने यासंदर्भात माहिती दिली असून त्यांच्या माहितीनुसार ज्यांच्याकडे वैध आधार क्रमांक असून तो मोबाइल नंबर बरोबर जोडण्यात आलेला आहे अशाच नागरिकांना या सुविधा मिळणार आहे. अगोदर ही सुविधा आयकर विभागाच्या फायलिंग पोर्टलवर फक्त ट्रायल बेसवर सुरू केली गेली होती. मात्र आता ही योजना अधिकृतरित्या लाँच करण्यात आली असून पॅन कार्ड देण्याची (PAN allotment) ही प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस असणार आहे.