एनटीपीसी सीबीटी -1 निकालाबाबत उमेदवारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी रेल्वेची उच्चाधिकार समिती स्थापन

मुंबई : रेल्वे भरती मंडळाने 14-15 जानेवारी 2022 रोजी जारी केलेल्या नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (NTPC) च्या (केंद्रीय रोजगार अधिसूचना CEN 01/2019 ) पहिल्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणी (CBT) च्या निकालासंदर्भात उमेदवारांनी उपस्थित केलेल्या चिंता आणि शंकांचे निरसन करण्यासाठी एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे.
ही समिती उमेदवारांनी उपस्थित केलेले खालील मुद्दे विचारात घेऊन शिफारशी करेल :
1. CEN 01/2019 (एनटीपीसी ) च्या पहिल्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणी (CBT) चे निकाल आणि निवडलेल्या उमेदवारांना प्रभावित न करता विद्यमान यादीतील दुसऱ्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणी -CBT साठी उमेदवार निवडण्यासाठी वापरलेली पद्धत
2. CEN RRC 01/2019 मध्ये दुसऱ्या टप्प्यातील सीबीटीचा समावेश
उमेदवार त्यांच्या शंका आणि सूचना समितीकडे पुढील ईमेल आयडीवर नोंदवू शकतात:
[email protected]
रेल्वे भरती मंडळाच्या सर्व अध्यक्षांना त्यांच्या विद्यमान स्रोतांकडून उमेदवारांच्या तक्रारी प्राप्त करण्याचे आणि त्या संकलित करून समितीकडे पाठवण्याचे .निर्देश देण्यात आले आहेत.
उमेदवारांना त्यांच्या शंका आणि सूचना सादर करण्यासाठी तीन आठवड्यांचा म्हणजेच 16.02.2022 पर्यंत वेळ देण्यात आला आहे आणि या चिंता जाणून घेतल्यानंतर समिती 4.03.2022 पर्यंत त्यांच्या शिफारसी सादर करेल.
या पार्श्वभूमीवर CEN 01/2019 (NTPC) ची 15 फेब्रुवारी 2022 रोजी सुरु होणारी दुसऱ्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणी (सीबीटी ) आणि CEN RRC 01/2019 ची 23 फेब्रुवारी रोजी सुरु होणारी पहिल्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणी (सीबीटी ) पुढे ढकलण्यात आली आहे.