दौंड तालुका : बोरिपार्धी – केडगाव जिल्हापरिषद गटात आता कमालीची चुरस वाढली आहे. या गटात संताजी उर्फ मनोज शेळके आणि अजित शितोळे यांनी निवडणूक रींगणात उतरण्याचा निर्णय घेत कंबर कसली आहे.
वरील दोन्ही उमेदवारांनी निवडणुकीत उतरण्याचे कारण आहे राजकारणात पदाधिकाऱ्यांचा होणारा सोईनुसार वापर आणि वापर झाला की नंतर आश्वासन हवेत विरून पुढील निवडणुकीपर्यंत मिळणारा डच्चू. याच गोष्टींना आता या पदाधिकाऱ्यांनी कंटाळून आपली ताकत दाखविण्याचा निर्णय घेतलेला दिसत आहे. मात्र वरिष्ठ राजकीय मंडळींच्या दबावापुढे आता हे बंड किती टिकते की पुन्हा आश्वासन मिळून बंड शमविले जात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सध्या बोरिपार्धी – केडगाव गटात तुषार थोरात विरुद्ध अभिषेक थोरात यांचा सामना पहायला मिळणार असल्याचे दिसत आहे. मात्र आता या दुहेरी लढतीचे रूपांतर चौरंगी लढतीमध्ये होताना दिसत आहे. या गटात चौरंगी लढत झाल्यास नेमकं कोण विजयी होईल हे सांगणे कठीण होणार आहे. कारण प्रत्येक उमेदवाराची आपली ताकत आहे आणि त्यांना मानणारा एक वेगळा वर्ग आहे. उद्या या उमेदवारांनी फॉर्म भरु नये यासाठी मोठा दबाव येण्याची शक्यता आहे आणि जरी फॉर्म भरला तरी तो मागे घेण्यासाठीही मोठा दबाव असणार आहे त्यामुळे आता हे उमेदवार फॉर्म भरल्यानंतर या रेसमध्ये टिकणार की पुन्हा आश्वासनांचे बळी ठरणार हे लवकरच समजणार आहे.







