दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव स्टेशन आणि केडगाव गावठाण येथील जिल्हापरिषद शाळेच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा आणि मेलेले कुत्रे टाकण्याचा गंभीर प्रकार ‛सहकारनामा’ ने काल बातमीतून समोर आणला होता.
बातमी लागल्यानंतर केडगाव ग्रामपंचायतीने त्वरित या ठिकाणी आपले स्वच्छता कर्मचारी पाठवून संबंधित जागेतील कचरा आणि मेलेले कुत्रे उचलून स्वच्छता केली आहे. ‛सहकारनामा’ च्या बातमी नंतर अनेक नागरिकांच्या आणि पालकांच्या प्रतिक्रिया आल्या आणि त्यांनी याबाबत ‛सहकारनामा’ च्या बातमीचे स्वागत केले आहे.
याबाबत केडगावचे सरपंच अजित शेलार पाटील यांनी नागरिकांनी कचरा हा कचरा कुंडीमध्येच टाकत जावा, मेलेली जनावरे इकडे तिकडे न टाकता त्याचा योग्य बंदोबस्त करावा असे आवाहन केले आहे.
सरपंच अजित शेलार पाटील यांचे आवाहन