दौंड : केडगाव ता.दौंड येथे एका युवकावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना काही वेळापूर्वी घडली असून या घटनेमुळे केडगाव परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेतील संशईत आरोपीच्या घराचीही तोडफोड करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली असून तेथील परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. शुभम प्रकाश शेळके असे हल्ला झालेल्या युवकाचे नाव असून त्याच्यावर केडगाव स्टेशन येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मागील काळातही एका नाजूक विषयावरून शुभम शेळके याच्यावर हल्ला झाला होता. त्याच विषयावरून हा हल्ला झाला की अन्य जुन्या वादातून त्यावर हा हल्ला झाला असावा याबाबत केडगावमध्ये उलट सुलट चर्चा सुरु आहे.
यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी आरोपिंना पकडण्यासाठी पोलीस पथक पाठवले असून यवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.