दौंड : दौंड नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावामध्ये शहरातील तीन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच येथील वेताळ नगर परिसरातील घराशेजारीच असलेल्या शेततळ्यामध्ये एका युवकाचा बुडून मृत्यू झाला असल्याची घटना घडली.
मंगेश संदीप जगदाळे (वय 19″रा.वेताळ नगर, दौंड ) असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
हरिश्चंद्र जगदाळे (रा.वेताळ नगर) यांनी फिर्याद दिली. दि.9 मार्च दुपारी 1 वा. च्या सुमारास मंगेश हा आपल्या राहत्या घरा शेजारी असलेल्या शेततळ्यामध्ये पडून बुडाला, नातलगांनी त्यास पाण्याबाहेर काढून उपचारासाठी येथील खाजगी दवाखान्या मध्ये नेले असता डॉक्टरांनी तो आधीच मृत असल्याचे सांगितले. मंगेश याचा एक वर्षापूर्वीच दुचाकीचा भीषण अपघात झाला होता परंतु उपचारानंतर त्यामधून तो सहीसलामत बाहेर आला होता, आज मात्र काळाने त्याच्यावर घातलेल्या घाल्या मध्ये त्याचा मृत्यू झाला. मंगेश च्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.