पुणे : आयटीआय मध्ये नापास झालेल्यांना आता एक संधी चालून आली आहे. जर तुम्ही आयटीआय मध्ये अनुत्तीर्ण झाले असाल मात्र 10 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही जर खाली दिलेल्या निर्देशानुसार संपर्क साधला तर तुम्हाला उत्तीर्ण होण्याची पुन्हा एक संधी मिळणार आहे.
या काळातील विद्यार्थ्यांना मोठी संधी
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये 2014 ते 2019 या प्रवेश सत्रात प्रवेश घेतलेल्या परंतु परीक्षामध्ये अनुतीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांकरीता प्रशिक्षण महासंचालनालय, नवी दिल्ली मार्फत अखिल भारतीय व्यवसाय सत्र व वार्षिक पुरवणी परीक्षा 25 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी 10 नोव्हेंबर पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे.
वार्षिक पुरवणी परीक्षा संगणक आधारित चाचणी (सीबीटी) पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षेकरीता पात्र विद्यार्थ्यांची यादी राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर 10 नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रवेशपत्र 20 ते 25 नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध होणार आहेत.
याबाबतची अधिक माहिती https://ncvtmis.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिकाधिक प्रशिक्षणार्थ्यांनी वार्षिक पुरवणी परीक्षेत सहभागी व्हावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य उपसंचालक आर.बी. भावसार यांनी केले आहे.