योग दिन विशेष :
भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल. भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारली असून, योगासनांचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत.
सांगली प्रतिनिधी : (सुधीर गोखले) जगभरातील देशांनी केवळ योग स्वीकारला नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला.
आजचा जागतिक योग दिवस संपूर्ण देशात उत्साहात साजरा करण्यात आला असून पुणे, सांगली सातारा येथेही योगदिन विविध ठिकाणी विविध संस्था शाळांमधून उत्साहात साजरा झाला. सांगली जिल्ह्यात जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ. सुरेश खाडे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, आ. सुधीर गाडगीळ, भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्यासह, शेखर इनामदार भाजप अनु जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रा. मोहन वनखंडे, युवा नेते सुशांत खाडे, गटनेत्या भारती दिगडे, मनपा आयुक्त सुनील पवार यांनी आज योग दिनामध्ये सहभाग घेतला. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली अंतर्गत तालुका क्रीडा संकुल मिरज व मिरजेतील मातोश्री तानूबाई दगडू खाडे इंग्लिश मिडीयम स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योगदिन निमित्त आयोजन करण्यात आले.
पुणे, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी – (पूजा भोंडवे) : पुणे, पिंपरी चिंचवड, आणि दौंडमध्ये सुद्धा योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरी पुणे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे योगा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री. विश्वास जाधव, सौ कल्याणी फाळके, कु. स्वप्नाली जाविर हे योग प्रशिक्षक उपस्थीत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील योगाच महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांकडून योगाची काही प्रात्यक्षिके करून घेतली. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य देशमुख सर, तसेच विद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गर्जे सर यांनी केले. प्रास्ताविक सावळकर सर यांनी केले . पाहुण्यांची ओळख बी.बी शिंदे सर यांनी करून दिली तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुर्वे सर यांनी केले. कार्यक्रम अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडला.
दौंड शहर प्रतिनिधी (अख्तर काझी) : दौंडमध्ये जागतिक योग दिन विविध माध्यमातून साजरा करण्यात आला. दौंड प्राथमिक आरोग्य पथकाच्या वतीने नागरिकांमध्ये योगासनाची आवड निर्माण होण्याकरिता तसेच योग प्रसारासाठी योगाची माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. या पुस्तकाचे प्रकाशन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हंकारे यांच्या हस्ते करण्यात आले. दौंड चे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांच्या हस्ते कर्मचारी वर्ग तसेच नागरिकांना पुस्तिकीचे वाटप करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जाधव, डॉ.साखरे,, डॉ. अडके ,डॉ. वाघ, डॉ. गावडे ,डॉ. जोशी, योग शिक्षक राजू गजधाने, गायकवाड ,लातूरे, कैलास पारचे आदी उपस्थित होते. नानविज येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला. योग दिनानिमित्ताने दौंड मधील फिट अँड हेल्थ क्लब च्या वतीने डॉ. संदीप कटारिया यांनी प्रशिक्षण केंद्रामध्ये योग सेशन घेतला त्यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील खोरवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही योगदिन साजरा झाला. यावेळी शिक्षक नीता भद्रे, साक्षी कोंडेजकर, शितल कदम कुंदन सकट व विद्यार्थ्यांनी सुंदर योगासने करून दाखविली. शाळेचे सहशिक्षक अभिजीत कोंडेजकर यांनी योगासनाचे महत्त्व पटवून दिले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शितल सोनवणे, उपाध्यक्ष बाळासाहेब सकट, मुख्याध्यापक गौतम कांबळे, प्रशांत सकट, अतुल सोनवणे ,गायत्री शीपकुले व ग्रामस्थ उपस्थित होते.
देऊळगाव राजे प्रतिनिधी (राहुल अवचर) : खोरवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सुंदर अशी योगासने करून दाखवली. योग दिनाचा कार्यक्रम साधारण पणे दोन तास चालला सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात आनंदाने सहभाग घेतला होता यामध्ये पहिले ते सातवी मधील 198 विद्यार्थीनी सहभाग घेतला. शाळेतील सहशिक्षक अभिजीत कोंडेजकर यांनी योगासनाचे महत्त्व सांगितले तसेच विद्यार्थ्यांकडून नियमित योगासने करून घेण्याचा शाळेतील सर्व शिक्षकांनी मानस व्यक्त केला शाळेतील शिक्षिका नीता भद्रे ,साक्षी कोंडेजकर शितल कदम कुंदन सकट या शिक्षिकांनी योगासने करून दाखवली यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शितल सोनवणे ,उपाध्यक्ष बाबासाहेब सकट ,शाळेचे मुख्याध्यापक गौतम कांबळे प्रशांत सकट अतुल सोनवणे गायत्री शिपकुले इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
पारगाव प्रतिनिधी (विकास शेळके) : जागतिक योग दिनानिमित्त नानगाव शाळेतील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक शिक्षकांनी आज योगाचे महत्त्व आणि फायदे समजावून सांगून सर्व विद्यार्थ्यांकडून योगासने करून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षक आणि मान्यवरांकडून योगाचे महत्व पटवून देण्यात आले. योगाला हजारो वर्षांचा इतिहास असून, योग भारताच्या प्राचीन पंरपरेचा भाग आहे. तर निरोगी आयुष्यासाठी योगासन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. योगाचे फायदे खूप आहेत. योगामुळे शुगर, बद्धकोष्ठता यांसारख्या आजारांशी लढण्यासही मदत होते. मनःशांती आणि उत्तम आरोग्यासाठी योग आणि ध्यान आवश्यक मानले जाते. अनेकदा लोकांना असे वाटते की योगा केवळ शरीर लवचिक बनवण्यासाठी केला जातो, पण तसे नाही. योगाची अनेक आसने आहेत, ज्यांचे अनेक फायदे आहेत. योगाच्या मदतीने तुम्ही आयुष्यभर तरुण आणि निरोगी राहू शकता. अनेकदा लोक योगाला संथ माध्यम मानतात, पण तसे नाही. योग तुम्हाला अनेक प्रकारे निरोगी राहण्यास मदत करू शकतो. अशी माहिती उपास्थितांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आली यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका – शोभा विठ्ठल गुंड, शुभांगी तेज भोसले, रुपाली सातकर, सतीश वेताळ, नितीन ताकवणे, स्वाती खळदकर, आरती साळुंके, अश्विनी खामकर हे उपस्थित होते.
सोमेश्वर प्रतिनिधी (शौकत शेख) : सौ लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निवेदिता पासलकर यांनी विद्यार्थिनींना योगाचा इतिहास व महत्व समजावून सांगितले. स्थानिक स्कूल समितीच्या सदस्या रेणुकाताई कोठडीया यांनी विद्यार्थिनींकडून योगाचे प्रात्यक्षिक करून घेतले. यावेळी सुमारे 600 विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. संगीत आणि योगा यांचा समन्वय साधत इयत्ता सातवी मधील काही विद्यार्थ्यांनीनी योगा डान्स चे सादरीकरण केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक उत्तम लोकरे यांनी सर्वांचे आभार मानले. उपशिक्षिका माया गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले . कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.