Categories: Previos News

काल ‘वरवंड’ आज ‘केडगाव’ – तोच ‘राडा’ अण तशीच ‘हाणामारी’

अब्बास शेख

दौंड : सध्या संपूर्ण पुणे जिल्ह्यात भाईगिरीचे पेव फुटले आहे. जो तो स्वतःला भाई समजू लागला आहे. मिळेल तिथे दहशत माजवायची आणि राडा करायचा असाच कार्यक्रम सध्या राबवला जात आहे. पुण्यात एकीकडे कोयता गँग दहशत माजवत आहे तर दुसरीकडे आता शालेय विद्यार्थी हाणामारीचा अभ्यास पूर्ण करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

मारामारीचे हे पेव आता शालेय विद्यार्थ्यांमध्ये फोफावत असून दौंड तालुक्यात तर याला उधाण आले आहे. गेल्या चार दिवसांपूर्वीच वरवंड येथे शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोठी हाणामारी झाली होती. तसाच प्रकार आज दि.30 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास केडगाव येथील जवाहरलाल विद्यालयाच्या गेटच्या बाहेर घडला आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा शालेय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास केडगाव येथील जवाहरलाल विद्यालयच्या गेट समोर काही शालेय विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसन नंतर मोठ्या हाणामारीत झाले! हाणामारीला मोठे स्वरूप येण्याचे कारण यात बाहेरील व्यक्तींनी येऊन केलेला हस्तक्षेप असल्याचे बोलले जात आहे. या शालेय विद्यार्थ्यांमध्ये दोन्ही बाजूकडील बाहेरील युवकांनी हस्तक्षेप करत विद्यार्थी आणि एक दुसऱ्याला जबर मारहाण केली. याबाबत केडगाव पोलीस चौकीत परस्पर विरोधी तक्रार देण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

दौंड तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांमध्ये मारामारी, हाणामारीचे प्रकार वाढले असून याला शाळेबाहेरील युवक कारणीभूत असल्याचा आरोप पालक वर्गातून केला जात आहे. शालेय मुलांना भडकावून त्यांना भाईगिरी स्टाईलची भुरळ घालून मारामारी करण्यास परावृत्त केले जात आहे त्यामुळे शाळेच्या बाहेर चकरा मारणाऱ्या उपट सुंभांवर वेळीच पोलीस कारवाई करण्याची गरज आहे अन्यथा शाळेतून डॉक्टर, वकील, इंजिनिअर तयार होण्याऐवजी गुंड, भाई तयार व्हायला वेळ लागणार नाही.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

20 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago