‘होय’ भीमा पाटस साखर कारखाना सुरु… तोही सहकारी तत्वावरच, ‘या’ ग्रुपने कारखाना घेतला भाडे तत्वावर चालवायला

अब्बास शेख

दौंड :काल रात्री भीमा पाटस कारखान्यावर सायरन (भोंगा) वाजला अण सभासद शेतकऱ्यांसह कामगारांच्याही आशा पल्लवीत झाल्या. भिमा पाटस साखर कारखाना हा भाडेतत्वावर साई प्रिया शुगर (निराणी शुगर्स) या कंपनीला चालवायला दिला असुन कारखाना या हंगामात सुरू होणार असल्याने शेतकरी व कामगार यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्य सहकारी बँकेने भिमा पाटस कारखाना चालविण्यासाठी देण्याचा करार नुकताच झाला आहे. आज दि.२० रोजी सकाळीच साई प्रिया शुगर (निराणी शुगर) चे संचालक संगमेश निराणी यांनी कारखान्यास भेट देवुन संपुर्ण माहिती घेतली. यावेळी कारखान्याचे चेअरमन आमदार राहुल कुल, भिमा पाटसचे माजी व्हॉईस चेअरमन सत्वशिल शितोळे, व्हाईस चेअरमन नामदेव बारवकर यांच्यासह कारखान्याचे संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते.

साई प्रिया शुगर(निराणी शुगर) चे संचालक संगमेश निराणी यांनी पाहणी करताना कारखान्याचे कामकाज तात्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या असून त्या दृष्टीने भिमा पाटसच्या कामगारांना उद्याच कामावर येण्याच्या सूचना देखिल केल्या आहेत.
यावेळी भिमा पाटसचे चेअरमन आमदार राहुल कुल म्हणाले की, राज्य सहकारी बँकेने कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा प्रसिध्द केली होती. त्यानुसार साई प्रिया शुगरल (निराणी शुगर) ला निविदा मिळाली होती. कारखाना हा सहकारी तत्वावरच सुरू राहणार आहे. साई प्रिया शुगर (निराणी शुगर) यांना कारखान्यासाठी पुर्ण सहकार्य करणार आहे.

यावेळी पाहणी करताना कारखान्याचे माजी व्हॉईस चेअरमन सत्वशील शितोळे यांनीही कारखाना लवकर सुरू करा व त्यासाठी आमच्याकडून जे सहकार्य हवे असल्यास ते आम्ही करु असे आश्वासन दिले.