Categories: क्राईम

यवत गावामध्ये एकाचा धारदार शस्त्राने भोसकून ‘खून’

दौंड : दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये 27 जुलै रोजी पहाटेच्यावेळी एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.

हा खून पालखी तळाजवळ असणाऱ्या मंदिरा शेजारी झाला असून मृत व्यक्तीचे नाव संजय बनकर (वय 46 रा.सोलापूर ) असे आहे. भर लोकवस्तीजवळ हा खून झाल्याने यवत परिसरात खळबळ माजली आहे. खून झाल्यानंतर 27 जुलै रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर यवत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे.

हा खून रात्री 12 ते पहाटे 4 च्या दरम्यान झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून याबाबत अधिक तपास सुरु आहे. या खुनातील मृतक संजय सखाराम बनकर हा सोलापूर शहरातील रहिवाशी असून to इथे कसा आला आणि त्याचा खून कोणी केला याबाबत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

14 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago