Categories: पुणे

सर्वत्र वाजतोय ‘यवत’ पोलिसांच्या कार्याचा ‘डंका’, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना मिळाला हा ‘सर्वोत्कृष्ठ पुरस्कार’

पुणे : गेल्या वर्षभरात विविध गुन्ह्यांची उकल करून चोर,दरोडेखोर आणि माफियांना जेरीस आणणाऱ्या यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना सर्वोत्कृष्ठ मालमत्ता हस्तगत करण्याचा पुरस्कार पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक नारायण पवार यांसह यवत चे पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड यांनाही उत्कृष्ठ कामगिरीबद्दल गौरविण्यात आले आहे. विविध गुन्ह्यांतील माल हस्तगत करतानाचा राहू येथे सातगावठी पिस्टल व 24 राऊंड सहा आरोपींकडून हस्तगत केल्याबद्दल पोलीस अधीक्षक सो यांच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आले आहे.

गेल्या वर्षभरात मटका, जुगार,गुटखा,वाळू,माती माफियांना आवर घालण्यात पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना मोठे यश आले असून दादागिरी आणि भाईगिरी करणाऱ्यांवर त्यांनी चांगलाच वचक बसवला आहे. कोणताही गुन्हा करताना दहावेळा विचार करायला लावणारी यंत्रणा त्यांनी उत्कृष्ठ पद्धतीने राबवली असून त्यांना मिळालेल्या पुरस्काराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

16 मि. ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

21 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago