बोरिभडक येथील खून 8 तासात उघड, यवत पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी केला जेरबंद

दौंड : बोरीभडक ता.दौंड जि.पुणे येथील खुनाचा गुन्हा ८ तासात उघडकीस आणण्यात
यवत पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
दिनांक २१/११/२०२१ रोजी फिर्यादी पांडुरंग मारुती बंडेवाड (वय २८ रा.टिळेकर नगर कात्रज पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक २१/११/२०२१ रोजी सकाळी ९:३० वाजण्यापूर्वी बोरीभडक (ता.दौंड जि. पुणे) येथील वन विभागाचे जमिनीत त्यांचा तृतीयपंथी लहान भाऊ मगरध्वज मारुती बंडेवाड उर्फ बंटी (वय २६ रा.कोळवाडी ता.अहमदपूर जि. लातूर सध्या रा.थेऊर ता.हवेली जि.पुणे) याचा कोणीतरी खून केला असून त्याच्या डोक्यातुन व तोंडातून रक्तस्त्राव होत असल्याची फिर्याद त्यांनी यवत पोलीस स्टेशन येथे दिली होती. त्यानुसार गु.र.नं.१००५ /२०२१ भा. द.वि. क.३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खुनाची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेने सदर खुनाचे गुन्ह्याचे ठिकाणी भेट देऊन संयुक्त तपास सुरू करून माहिती संकलित करून थेऊर फाटा ते सहजपुर फाटा पर्यंतचे CCTV फुटेज चेक केले. सदर CCTV फुटेज मध्ये मयत मगरध्वज बंडेवाड याचे सोबत आणखीन एक जण असलेचे दिसत होते. यवत पोलीस स्टेशन टीम व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मयतासोबत त्याचा सहकारी काजल चव्हाण असल्याची माहिती काढून त्यास थेऊर येथून चौकशी कामी ताब्यात घेऊन चौकशी केली असता काजल चव्हाण हा सुरवातीला उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला परंतु वरील पोलीस पथकाने त्याचेकडे सखोल चौकशी केली असता सदरचा खून काजल उर्फ केशव उमाजी चव्हाण (वय २६ रा.रुई धानोरा ता.गेवराई जि. बीड सध्या रा.थेऊर ता.हवेली जि. पुणे) यानेच केलेचे उघडकीस आले. हा गुन्हा फक्त आठ तासातच उघडकीस आनल्याने यवत पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे कौतुक होत आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली खालील पोलीस पथकाने केली आहे.

पोलीस निरीक्षक अशोक शेळके
पोलीस निरीक्षक नारायण पवार
सपोनि केशव वाबळे
सपोनि स्वप्नील लोखंडे
सपोनि सचिन काळे
सपोनि संदीप येळे
पोलीस हवालदार सचिन घाडगे
पोलीस हवालदार निलेश कदम
पोलीस हवालदार गुरूनाथ गायकवाड
पोलीस हवालदार गणेश करचे
पोलीस हवालदार राजीव शिंदे
पोलीस हवालदार संदीप देवकर
पोलीस नाईक महेंद्र चांदणे
पोलीस नाईक रामदास जगताप
पोलीस नाईक मेघराज जगताप
पोलीस नाईक निखिल रणदिवे
पोलीस शिपाई सोमनाथ सुपेकर
पोलीस शिपाई मारुती बाराते
पोलीस शिपाई किरण तुपे
यांचे पथकाने केली आहे.