दौंड : दौंड तालुक्यातील पाटस येथे जवळपास 6 4 ठिकाणी दरोडा टाकून पाटस हादरवून सोडले. मात्र यवत पोलीसांनीही कमाल करत या दरोडेखोरांचा जीवाची परवा न करता पाठलाग सुरू केला आणि अखेर एक दरोडेखोर जेरबंद करण्यात त्यांना यश आले.
दरोडेखोरांनी शुक्रवारी रात्रीच्या वेळी पाटस परिसरातील 3 घरांची घरफोडी तर एक घरावर दरोडा टाकला. हि माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि गस्तीवर असणारे पाटस चौकीचे पोलिस
हवालदार संदीप कदम यांना समजली पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कदम यांनी त्वरित ग्रामसुरक्षा दलाच्या युवकांना जमवून या दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला.
हा पाठलाग सुरु असताना एका दरोडेखोराने पोलिस कर्मचारी संदीप कदम यांच्यावर दगड, विटांनी हल्ला केला यात ते चांगलेच जखमी झाले मात्र जखमी अवस्थेतही कदम यांनी मोठया चपळाईने एका दरोडेखोराला पकडले.
सध्या या टोळीतील एक दरोडेखोर जेरबंद करण्यात आला असून अन्य दरोडेखोर निष्पन्न झाले असून त्यांनाही पकडण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे.
वरील कामगिरी ही पोनी नारायण पवार, पो.उप.नी नागरगोजे, पॉकॉ संदीप कदम यांसह यवत पोलीस स्टाफ आणि ग्राम सुरक्षा दलाच्या युवकांनी केली आहे.