Categories: क्राईम

Big News : विद्युत ट्रान्सफार्मर चोरणारी टोळी यवत पोलिसांनी केली जेरबंद! 26 गुन्ह्यात फरार असलेला आरोपी निघाला टोळीचा म्होरक्या, 3 लाख 36 हजारांचा मुद्देमाल जप्त

दौंड :

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील विद्युत ट्रान्सफॉर्मर चोऱ्या करणारी टोळी जेरबंद करण्यात यवत पोलिसांना यश आले आहे. यवत पोलिसांनी तब्बल २६ गुन्हयातील फरार म्होरक्या कडुन आणखीन ४ गुन्हे उघडकीस
आणले असून यवत गुन्हे शोध पथकाची हि मोठी कारवाई समजली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ०२/०७/२०२२ रोजी बोरीभडक, ता.दौंड जि. पुणे येथील शेत जमीन गट नं.१४/१ मधील शिवाजी धर्मा गायकवाड यांचे शेतात असलेली डीपी कोणीतरी अज्ञात चोरट्यााने स्ट्रक्चर वरून नट बोल्ट खोलून खाली पाडून त्यातील अंदाजे एकूण १०० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्या होत्या. याबाबत यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दिनांक ०८/०७/३०२२ रोजी यवत पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की यवत पोलीस स्टेशन हद्दीतील डीपी चोरणारे संशयित राहू शिवाजी चौक येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीवरून सदर पोलीस पथकाने गुन्हे शोध पथकातील पोलीस स्टाफसह राहू छत्रपती शिवाजी महाराज चैक येथे सापळा लावून थांबले होते. यावेळी एक संशयित कार मधील चार इसम राहू येथील लक्ष्मीआई मंदिराजवळ आल्यानंतर यवत गुन्हे शोध पथकाने त्यांना मारुती ८०० कारसह ताब्यात घेऊन विचारपूस केली असता यातील संशयित इसमांनी त्यांचे इतर साथीदारांचे मदतीने राहु, कानगाव, पाटस, कासुर्डी, बोरीभडक, खुटबाव, उंडवडी, कोरेगाव भिवर असे यवत पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण २८ रोहित्र (डीपी) चोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले.

रोहित्र चोरी करणाऱ्या टोळीमध्ये आरोपी १) दत्ता अशोक शिंदे (वय २८ वर्षे, रा.राहु, थोरले विहीर, ता.दौंड जि.पुणे) २) राज मच्छिंद्र वानखडे (वय १९ वर्षे, रा.केडगाव, म्हसोबाचा मळा, ता.दौंड, जि.पुणे. मुळ रा.बिडगाव, ता.मुर्तुजापुर, जि.अकोला) ३) विशाल मनोहर सोनवणे (वय ३० वर्षे रा.सासवड, ता.पुरंदर, जि.पुणे) ४) महादेव उर्फ सोन्या कमलाकर पवार (वय २९ वर्षे, रा.केडगाव, ता.दौंड, जि.पुणे) यांचा समावेश असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवुन त्यांनी चोरीचा माल इसम आमजद पाशामियाॅ खान (वय ४० वर्षे, रा. साईनगर, कोंढवा, ता.हवेली, जि.पुणे) यास विकल्याने त्यास सदर गुन्ह्याचे कामी ताब्यात घेण्यात आले असुन त्याचेकडुन कि.रू १७६७५०/- रू च्या ३५०किलो तांब्याच्या तारा जप्त करणेत आलेल्या आहेत.

तसेच आरोपींकडुन गुन्ह्यात वापरलेल्या दोन मारूती ८०० कार, एक पॅशन प्लस मोटार सायकल व चार मोबाईल असा १६०,०००/- रू किमतीसह एकुण ३,३६,७५०/- रू चा मुददेमाल जप्त करणेत आलेला आहे.
सदर आरोपींना मा.अपर व सत्र न्यायालय साो बारामती यांनी ३ दिवस पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली असून वरील आरोपींकडून यवत पोलीस स्टेशन कडील रोहित्र चोरीचे ४ गुन्हे उघडकीस आलेले आहेत ती माहिती खालीलप्रमाणे.
१)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.५३९/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
२) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.५१५/२०२२, भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
३) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.४८४/2022, भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
४)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.५०६/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
असे एकूण ४ रोहित्र (डीपी) चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून आरोपींकडून ३,३६,७५०/- रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी दत्ता अशोक शिंदे (रा.राहु थोरली विहीर, ता.दौंड, जि.पुणे) हा रेकाॅर्ड वरील गुन्हेगार असुन तो २६ गुन्हयांमध्ये फरार होता.
तर आरोपी महादेव उर्फ सोन्या कमलाकर पवार (रा.धुमळीचा मळा, केडगाव, ता.दौंड, जि.पुणे) व राज मच्छिंद्र वानखेडे (रा.केडगाव, म्हसोबाचा मळा, ता.दौंड, जि.पुणे) ११ गुन्हयांमध्ये फरार होते.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पो.हवा. निलेश कदम, पो.हवा. गुरू गायकवाड, पो.हवा. गणेश कर्चे, पो.ना. अक्षय यादव, पो.ना. रामदास जगताप, पो.काॅ.प्रविण चैधर, पो.काॅ.मारूती बाराते, पो.हवा. सचिन गायकवाड,पो.ना. सुनिल कोळी, पोलीस मित्र निलेश चव्हाण यांनी केलेली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

20 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago