यवत पोलिसांकडून गांजा तस्करांची धरपकड, 2 आरोपिंकडून 1 लाख 84 हजार रुपयांचा 10 किलो गांजा जप्त

दौंड : गांजा तस्करी करणाऱ्या 2 आरोपिंना यवत पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून सुमारे 1लाख 84हजार 212 रुपये किमतीचा 10 किलो 234 ग्रॅम वजनाचा गांजा यावेळी पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत सागर दशरथ क्षिरसागर, (पो.शि. 2741 नेमणुक यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामिण) यांनी फिर्याद दिली असून आरोपिंवर एन.डी.पी.एस.कायदा 1985 चे कलम 8 (सी), 20 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कासुर्डी ता.दौंड या गावच्या हद्दीमध्ये हॉटेल नुर च्या पाठीमागे दि.03/05/2022 रोजी 10ः30 वाचे सुमारास
आरोपी 1) संदीप मधुकर चव्हाते (वय 27, रा. शास्त्रीनगर कोथरूड पुणे) 2) अक्षय सतिष जाधव (वय 24, रा. शास्त्रीनगर कोथरूड पुणे) यांनी कासुर्डी गावचे हद्दीमध्ये असणाऱ्या हॉटेल नुर च्या पाठीमागे सोलापुर पुणे रोडच्या कडेला मोटार सायकल नंबर एम.एच 12 क्यु.के. 7228 यावरून 1 लाख 84 हजार 212 रुपये किमतीचा सुमारे 10.234 किलो वजनाचा गांजा बेकायदेशीररित्या वाहतुक करीत असताना मिळून आले.

पोलिसांनी लागलीच आरोपिंना अटक करून त्यांच्यावर एन.डी.पी.एस.कायदा 1985 चे कलम 8 (सी), 20 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक नारायण पवार हे करत असून पोसई/गंपले यांनी हा गुन्हा दाखल करून घेतला आहे.