‘श्री बोरमलनाथ’ यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न

केडगाव : बोरीपार्धी येथील श्री बोरमलनाथ यात्रा उत्सव चैत्र पोर्णीमेला दर वर्षी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो पण कोरोनामुळे तिन वर्ष यात्रा उत्सव झाला नव्हता तो यंदा ग्रामस्थांच्या सहभागाने अतिषय उत्साहात पार पडला.

शुक्रवार दि १५/४/२०२२ रोजी यात्रेला सुरुवात झाली. यावेळी नाथांचा छबिना बोरीपार्धी गावठाण ते बोरमलनाथ मंदिर असा ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत निघाला होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला गावातील लहान थोरांपासुन ते महिलावर्गापर्यंत सर्वांनी सहभाग नोंदवत आनंद घेतला.

दि.१६/४/२०२२ रोजी सकाळी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येऊन भजनरत्न श्री.मल्हारी दादा सोडनवर (महाराष्ट्र पोलीस) व सहकारी यांचे भजनाचा कार्यक्रम झाला. दुपारी मानकऱ्यांचे हस्ते मुख्य मंदिरात आरती झाल्यानंतर आलेल्या सर्व मानकऱ्यांचे व भक्तांचे बोरमलनाथांचे पुजारी कैलास आबा शेलार यांनी आभार मानले. यात्रेतील करमणूकीचे मुख्य आकर्षण असलेला लोकशाहीर भिका भिमा सांगविकर यांचा लोकनाट्य तमाशा रात्री संपन्न झाला तर दुसऱ्या दिवशी हजऱ्या व कुस्त्यांचा जंगी आखाडा झाला.

शेवटची कुस्ती पहिलवान खताळ व पहिलवान दिवेकर यांची श्री मल्हारी आबा गडधे माजी संचालक भिमा पाटस यांचे हस्ते लावणेत आली. यावेळी पंच म्हणुन जयदीप सोडनवर, दिगंबर ताडगे, निलेश ताडगे, संतोष सोडनवर यांनी काम पाहिले तर यात्रा कमीटीचे अध्यक्ष बाळासाहेब सोडनवर, उपाध्यक्ष दशरथ दिवेकर, खजिनदार पंढरीनाथ सोडनवर व विजय टेंगले यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामपंचायत सदस्य आशोक आडसुळ, बंडू नेवसे, संदिप सोडनवर, प्रशांत ताडगे, महेश सोडनवर, अभि टेंगले, दादा नेवसे, तळेकर गुरूजी, रवींद्र चव्हाण, हरी फरगडे, दत्ता नेवसे या कमीटीच्या सदस्यांनी सहकार्य केले.

यात्रा उत्सवास सहकार्य केल्याबद्दल मल्हारी सोडनवर यांनी सर्व ग्रामस्थांचे व देणगीदारांचे आभार माणुन यात्रा उत्सवाचा हिशोब येणाऱ्या रविवारी श्री दत्त मंदिर बोरिपार्धी याठिकाणी केला जानार असल्याने सर्वांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन केले.