खुटबाव येथे विविध उपक्रमांनी महिला मेळावा संपन्न

आज खुटबाव (ता.दौंड) येथे क्रांतीज्योती ‘सावित्रीबाई फुले’ यांची पुण्यतिथी व ‘जागतिक महिला दिनाच्या’ निमित्ताने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दौंड पंचायत समिती व खुटबाव येथील 45 सहाय्यता समूह महिला बचत गट यांचा एकत्रित ‘महिला मेळावा’ पार पडला.

खुटबाव येथील सर्व ४५ महिला बचत गटाच्या सदस्या यावेळी उपस्थित होत्या. पं.स.महिला बालकल्याण समितीचे समन्वयक सचिन आटोळे यांनी यावेळी सर्व महिलांना बचत गटाविषयी मार्गदर्शन केले. बचत गटाचे महत्व त्याबाबतची जागृती, बचत गटाची अद्यावत माहिती कशी ठेवावी, महिला बचत गटांनी सामूहिक व्यवसाय कसे करावे, याबाबत त्यांनी विस्तृत असे मार्गदर्शन केले आणि शासनाच्या विविध खात्यांची बचत गटाबाबतची माहिती दिली.

यावेळी सर्व बचत गटाच्या समन्वयक स्नेहल नागरे, बचत गटाच्या समन्वयक मार्गदर्शिका सुनिता थोरात, वैशाली ढमढेरे, कमल शेलार, संगिता थोरात, संगिता ढोले, सारिका दोरगे, निलम थोरात, मोनिका थोरात आदि उपस्थित होत्या. यावेळी महिलांचे विविध कार्यक्रम घेण्यात’ आले या कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने भाग घेतला.